आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रविशंकर यांची औरंगाबाद शहरात धावती भेट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद । आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी गुरुवारी औरंगाबादला धावती भेट दिली. त्यांनी विद्यार्थी, साधकांना मार्गदर्शनही केले. दिल्लीला जाणा-या विमानास उशीर असल्याने ते धुळ्याहून श्रीनगर, गारखेडा येथील आर्ट ऑफ लिव्हिंगचे समन्वयक नंदकिशोर औटी यांच्या घरी वळले. तोपर्यंत शहराच्या विविध भागांतून सुमारे एक हजार साधक तेथे आले होते. त्यांना रविशंकर यांनी तिळगूळ वाटप करत मार्गदर्शन केले. यशवंत कला महाविद्यालयातील युवकांच्या आर्ट आॅफ लिव्हिंग वर्गात त्यांनी संवाद साधला. येणा-या निवडणुकांत प्रत्येक युवकाने मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. व्यसनांपासून दूर राहून समाजाचे हित साधा, असे आवाहन त्यांनी केले. रात्री 8 वाजेच्या विमानाने ते दिल्लीला रवाना झाले.