आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसापचे पदाधिकारी मागच्या दाराचे, श्रीकांत उमरीकर यांचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मराठवाडा साहित्य परिषदेचे विद्यमान पदाधिकारी मागच्या दाराने आलेले आहेत. घटनादुरुस्तीच्या नावाखाली नेहमी निवडणूक घेण्यास टाळाटाळ करत असलेली ही ‘कौतुकशाही’ साहित्यिकांची संस्था चालवू शकत नाही, असा अारोप परिवर्तनवादी आघाडीचे उमेदवार श्रीकांत उमरीकर यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

मसापच्या कार्यकारिणी निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे. पत्रकारांना उमेदवारांची माहिती देत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. उमरीकर म्हणाले, २२ जागांसाठी प्रथमच लोकशाही पद्धतीने निवडणूक होेत आहे. त्यासाठी ५२ उमेदवार रिंगणात आहेत. गेल्या तीन वर्षांपासून कार्यकारिणीचा कार्यकाळ संपूनही निवडणूक घेण्यात आली नाही. त्याचे कारण फक्त घटनादुरुस्ती होते. त्यामुळेच लोकशाहीच्या विजयासाठी ही परिवर्तनवादी आघाडी काम करणार आहे. यासाठी आम्ही साहित्य परिषदेचे उपक्रम लोकाभिमुख करणे, नवीन साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, परिषदेच्या मुखपत्राला प्रतिष्ठा मिळवून देणे आदी कार्ये करणार आहाेत. स्वतंत्ररीत्या उभे असलेले उमेदवार अनंत काळे, के. व्ही. सरवदे, डॉ. विलास गाजरे यांची मते परिवर्तनवादी आघाडीला मिळणार आहेत, असा दावा उमरीकरांनी केला. या वेळी प्रा. विद्या पाटील, डॉ. वासुदेव मुलाटे, प्रा. ललित अधाने यांची उपस्थिती होती.
- २२ जागांसाठी ५२ उमेदवार रिंगणात
- २ हजार ५७८ मतदाते
मतदानाची मुदत जुलै 1 ते २० ऑगस्ट
- २१ ऑगस्टला मतमोजणी निकाल जाहीर
बातम्या आणखी आहेत...