आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘श्रीमंत दामोदरपंत’चा प्रयोग, 'दिव्य मराठी' वाचकांसाठी आज विनोदी नाटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वाचकांशी विश्वासाचे नाते निर्माण करणाऱ्या दैनिक ‘दिव्य मराठी’च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (१४ मे) सायंकाळी साडेचार वाजता ‘श्रीमंत दामोदरपंत’ हे भन्नाट विनोदी नाटक सादर केले जाणार आहे. प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव एंटरटेन्मेंट निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित या नाटकाने राज्यभरातील नाट्यरसिकांना खळखळून हसवले आहे.
२९ मे रोजी ‘दिव्य मराठी’च्या औरंगाबाद आवृत्तीला चार वर्षे पूर्ण होत असून वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. वर्धापन दिनानिमित्त ११ मेपासून विविध कार्यक्रम सुरू करण्यात आले आहेत. प्रख्यात संशोधक, संपादक आनंद हर्डीकर यांच्या दोनदिवसीय व्याख्यानांनंतर १५ मे रोजी भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असलेले ‘श्रीमंत दामोदरपंत’ हे कौटुंबिक हास्य नाटक आयोजित करण्यात आले आहे.
सिडको (एन-५) येथील जगद्गुरू संत तुकाराम नाट्यगृहात सायंकाळी साडेचार वाजता नाटकाला प्रारंभ होणार आहे. विनोदी अभिनेते तथा ‘मोरूची मावशी’ फेम विजय चव्हाण, क्रांती रेडकर, रागिणी सावंत, राजीव सावंत आदींच्या भूमिका आहेत. प्रवेश सर्वांसाठी खुला मोफत असून मर्यादित आसनक्षमता असल्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रवेशिका ‘दिव्य मराठी’ कार्यालयातून नेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...