आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीराम रथोत्सव जल्लोषात साजरा, हजाराे भाविकांची मांदियाळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- ‘प्रभू सियावर रामचंद्र की जय...’च्या जयघोषात विविध धार्मिक कार्यक्रमांनी हजाराे भाविकांच्या मांदियाळीत रविवारी श्रीराम रथाेत्सव उत्साहात साजरा करण्यात अाला. कार्तिकी एकादशीनिमित्त श्रीराम मंदिर संस्थानतर्फे दरवर्षाप्रमाणे रथोत्सवाचे आयोजन करण्यात अाले होते.
तास उशिरा निघालेला रथ शहरातील किलोमीटरचा प्रवास करून निर्धारित वेळेेपेक्षा एक तास अगोदर अर्थात रात्री ११.०६ वाजता पोहोचल्यानंतर रथोत्सवाची सांगता झाली. या वेळी अनेक कलाकारांनी विविध कलाप्रकारांचे सादरीकरण करत उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेतले.

‘रथावर स्वार प्रभू श्रीराम निघाले, दर्शनास त्यांचे विश्वची आले,’ या उक्तीप्रमाणे ‘रथ चाले डोलात, राम आमच्या मनात...’ या भावनेने हजारो भाविकांची पाऊले दिवसभर रथोत्सवाच्या मार्गाकडे वळत होती. शास्त्री टॉवर, सुभाष चौक, दाणा बाजार, बोहरागल्ली, रथचौक, जुन्या जळगावचा परिसर भक्तिमय झाला होता. दुपारी १२वाजेनंतर उत्साहाला उधान अाले हाेते. तर सायंकाळी वाजेनंतर भक्त सुभाष चाैक परिसरात माेठ्या संख्यने जमले हाेते. अग्रभागी सनई-चौघडा असलेले पथक, लक्ष्मण अंभोरे यांचा तुतारीवरून दिला जाणारा आगमनाचा संदेश हा सर्वांचे लक्ष वेधणारा ठरला. यानंतर ‘लक्ष्य वेध’ या स्वराज्य निर्माण सेेनेेच्या ढोलपथकाचा कानठळ्या बसवणारा वाद्यांचा निनाद. त्यामागे रामायणासह विविध सामाजिक विषयावर प्रबोधन करणारे वावडदा येथील ओम साईराम मंडळाचे कलावंत. त्यानंतर संत मुक्ताईची पालखी विविध वेशभूषेत सहभागी झालेले कलावंत तसेच वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ यांचा रथाेत्सवात सहभाग हाेता. या सर्वांमागे नृत्य करणारा अश्व हा सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. मारुती पेठ मंडळाने विठ्ठल-रुख्माईचा देखावा सादर केला हाेता. ट्रॅक्टरवर विविध वेशभूषेत भारूड, गीते सादर करण्यात महिला, तरुणांचाही पुढाकार दिसून आला.
श्रीराम रथाची अारती करताना गिरीश महाजन, सुरेश भाेळे, राखी साेनवणे, रुबल अग्रवाल, डाॅ. जालिंदर सुपेकर, कैलास सोनवणे, सुनील महाजन भाविक.

जुना कापड बाजार असोसिएशन : जुनाकापड बाजार व्यापारी असोसिएशनतर्फे साबुदाणा खिचडी वाटप केली. असोसिएशनचे अध्यक्ष बाबूसेठ श्रीश्रीमाळ सचिव कांतीसेठ जैन यांनी वितरणास सुरुवात केली. महेंद्र जैन, सतीश अग्रवाल, पृथ्वीराज जैन, संजय कांकरिया. सुनील श्रीश्रीमाळ, पंकज कलाणी, सचिन जांगडा, भिकचंद चांदीवाल, विजय कासार, तेजपाल जैन उपस्थित होते. संघटनेतर्फे १५ वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात अाहे.

श्रीरामरिक्षा थांबा : श्रीरामरिक्षा स्टॉपतर्फे भाविकांना लस्सी देण्यात अाली. आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते उपक्रमास सुरुवात झाली. विजय चौधरी, सुनील झंवर, दीपक जोशी, माधव कुळकर्णी, फारुख शेख, अरुण शिरसाळे उपस्थित होते. जितेंद्र सपके, नगराज सपकाळे, आबा ठाकरे, सतीश सपकाळे, सुनील सपके, नितीन सपके, शिवाजी सपके यांनी कार्यक्रम आयोजित केला.

हनुमानमारवाडी व्यायाम शाळा :हनुमानमारवाडी व्यायाम शाळेतर्फे साबुदाणा खिचडी केळी प्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला. आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते सुरुवात झाली. सुनील तापडीया, योगेश सोनार, भरत कोळी, सतीश शर्मा, अनिल घाडगे, प्रदीप सपकाळे, रवींद्र कोळी यांनी नियोजन केले.

सोंग काढण्याची प्रथा कायम
रथोत्सवातसोंग काढण्याची प्रथा कायम असली तरी गेल्या दोन वर्षांपासून हे प्रमाण अतिशय नगण्य झाले आहे. चार ते पाच सोंगाच्या गटाने आपला नृत्यप्रकार रथोत्सवात सादर केला. रथोत्सवातील हे वेगळेपण सर्वांचे आकर्षणाचे केंद्र असले तरी यावर्षी सोंगांचे प्रमाण कमी दिसून आले. हरिहर भेटीपर्यंत सोंगांचा हा उत्सव सुरू असतो. ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकांना सोंगांचे विशेष आकर्षण असते.

धार्मिकतीर्थस्थळाचा दर्जा देणार
जळगावग्रामनगरीचे दैवत १४३ वर्षांची परंपरा असलेला रथोत्सव रविवारी उत्साहासह शांततेत साजरा करण्यात अाला. प्रभू श्रीरामांचे चरण या भूमीला लागले असून रामायण पर्वातील शबरीचा रहिवासही या भागातील असल्याचा उल्लेख कथानकांमधून येतो. भक्तीची परंपरा राहिलेल्या या उत्सवास सर्वतोपरी सहकार्य श्रीराम मंदिर संस्थेस धार्मिक तीर्थस्थळाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या वेळी संस्थेच्या विश्वस्तांना दिले. या वेळी मंत्री महाजन यांचे परिसरात स्वागत झाले.
रथाेत्सवात सोंग काढण्याची प्रथा यंदाही कायम राहिली.
गुलाब पाकळ्यांच्या पायघड्या अन् आकर्षक रांगोळ्यांनी सजले मार्ग
रथमार्गाक्रमण करणाऱ्या विविध रस्त्यांवर तसेच चौकाचौकात ठिकठिकाणी रांगोळी कलावंतांनी भव्य आकर्षक रांगोळ्या साकारल्या हाेत्या. तसेच गुलाबाच्या पायघड्या टाकल्या होत्या. श्रीराम रांगोळी ग्रुपच्या संचालिका कुमुद नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिभा कासार, वृषाली चौधरी, शंकर भावसार, विजय नारखेडे, माधुरी बारी, पल्लवी बारी, ज्योती बारी, रेवती बारी, हर्षदा खडके, जागृती खडके, दीक्षा काटोले यांनी भव्य रांगोळ्या साकारल्या. तर गुलाब पाकळ्यांच्या पायघड्या टाकल्या हाेत्या. रांगाेळ्या सर्व येणाऱ्या भाविकांचे लक्ष वेधून घेत हाेत्या. अनेक महिलांनी रथ मार्गावर सडा टाकून रांगाेळ्यांनी श्रीरामांचे स्वागत केले.

असेझालेत धार्मिक विधी
श्रीराममंदिरात कार्तिक एकादशीला पहाटे वाजता काकडा आरती झाली. सकाळी वाजता प्रभू श्रीरामचंद्रांच्या उत्सव मूर्तीस महाअभिषेक होऊन ७.३० वाजता महाआरती करण्यात अाली. यानंतर सांप्रदायिक भजन झाले. सकाळी ११ वाजता श्रीराम मंदिराजवळ गादीपती मंगेश महाराज जाेशी यांच्या उपस्थितीत शारदा वेदपाठ शाळेचे साखरे गुरुजी, योगेश्वर महाराज, नंदू शुक्ल, मुकुंद धर्माधिकारी यांच्यासह ब्रह्मवृदांच्या जयघोषात पूजेस प्रारंभ झाला. शांतीपाठ, गणेश, भारुड, मारुती पूजनानंतर रथ चक्रांचे पूजन करण्यात अाले. यानंतर रथास कोहळे अर्पण करून रथाची महापूजा करून रथाचे मार्गक्रमण झाले.

रस्त्यावर पिशव्यांचा खच
विविधसंस्थांतर्फे दिवसभर साबुदाणा खिचडीसह पाणी पाऊच, मठ्ठा लस्सीचे वितरण सुरू होते. त्यामुळे खाली झालेले ग्लास, पाऊच यांचा थर प्रत्येक रस्त्यावर दिसून आला. स्वच्छतेच्या कार्यात रथामागे पुढे अशा केवळ दोन संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. २५ कार्यकर्तेच स्वच्छतेचे काम करत असल्यामुळे त्यांचीही दमछाक झाली. रथाच्या मार्गावर सायंकाळी पिशव्या, कागदांचा मोठा थरच जमलेला दिसून आला. रथोत्सवानंतर महापालिका प्रशासनाने तत्काळ साफसफाईचे काम हाती घ्यावे, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली.
श्रीरामांसोबत सेल्फीचा माेह
प्रभूश्रीरामाची १४ फूट उंच आकर्षक मूर्ती ही मिरवणुकीतील आकर्षण ठरली. रथोत्सव कायम लक्षात राहावा, यासाठी अग्रभागी असलेल्या श्रीरामाच्या मूर्तीसोबत सेल्फी काढण्याचा मोह युवकांसह युवतींकडूनही आवरला गेला नाही. पवनपुत्र हनुमान श्रीरामांसोबत अनेकांनी मोबाइलमध्ये हा प्रसंग सेल्फी घेऊन कायमचा कॅमेराबद्ध केला. सजवलेला रथाजवळ उभे राहूनही अनेकांनी रथोत्सवाच्या आठवणींची सेल्फी घेतल्याचे चित्र दिसत होते.

१२.५०ला रथाेत्सवास प्रारंभ
सकाळी१२ वाजता जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रथाचे पूजन केले. या वेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, महापौर राखी सोनवणे, उपमहापौर सुनील महाजन, श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष मंगेश महाराज जोशी, रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, उपाध्यक्ष दुर्गादास नेवे, नगरसेवक ललित कोल्हे, कैलास सोनवणे, अॅड. सुशील अत्रे, विलास चौधरी, संजय चौधरी आदी उपस्थित होते. आरती होऊन ढोल-ताशांच्या गजरात तरुणाईच्या उत्साहात दुपारी १२.५० वाजता रथ मार्गक्रमणास सुरुवात झाली. भोईटे गढी, कोल्हे वाडा, तेलीचौक, रथचौकमार्गे सायंकाळी वाजता रथ सुभाष चौकात पाेहचला.
रविवार सुटीचा दिवस असूनही रथ मार्गावरील बहुतांश दुकाने व्यावसायिकांनी खुली ठेवली. रथाच्या चाकांना मोगरी लावण्याचे कौशल्याने काम करणाऱ्या ५८ सेवकांचा गौरव करण्यात आला. यातील काही सेवक गत २५ वर्षांपासून हे काम चोखपणे करत आहेत. दौलत पाटील, नारायण पाटील, शंकर चौधरी, पीतांबर चौधरी, प्रभाकर पाटील यांच्यासह यशवंत खडके, वासुदेव पाटील, सुजीत पाटील यांच्यासह विविध काम पाहणाऱ्या सेवकांचाही गौरवही झाला.
काेळीपेठेत घराच्या छतावरून रथाचे दर्शन घेताना मुस्लिम महिला.
श्रीराम रथाची मूर्ती घेऊन जाताना साखरे गुरुजी.

बाल रथाचे आकर्षण
गेल्याचार वर्षांपासून रथोत्सवाच्या पुढे लहान मुलांकडून छोटा रथ काढण्यात येत असतो. या वर्षी बालाजीपेठेसह रामपेठेतील लहान मुलांनीही रथ काढला. रथाच्या अग्रभागी असलेले दोन बाल रथ भाविकांचे लक्ष वेधत होते. या बालकांचे ढोलपथकही होते. दर्शनासाठी आलेले भाविक आपल्या लहान मुलांना हा रथ आवर्जुन दाखवत असल्याचे दिसले. मोठा रथ ओढणे शक्य नसल्याने मुलेही बाल रथ ओढून आनंद व्यक्त करत असल्याचे चित्र सर्वांचेच आकर्षण ठरले.

रथ जाताच मार्गाची स्वच्छता
शेकडो भाविकांची रथाच्या पुढे जाऊन सोहळा बघण्याची लगबग सुरू असताना गोपाळपुऱ्यातील गायत्री मित्र मंडळाच्या ४० कार्यकर्त्यांनी रथाच्या मागे राहत स्वच्छता माेहीम राबवली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केळीचे साल, फुलांच्या पाकळ्या, पाण्याचे रिकामे पाऊच प्लास्टिकचे ग्लास, फराळाच्या डिशेस उचलून मार्ग स्वच्छ केला. तर कचरा गाेळा करण्यासाठी वाहन सज्ज ठेवले हाेते. युवराज पाटील, गणेश पाटील, हर्षल फुसे, लक्ष्मण पाटील, मनोज पाटील यांनी यास सहकार्य केले. तर एल.के. फाउंडेशनतर्फे १५ पुरुष महिलांनीही रथाच्या पुढे जाऊन स्वच्छता करत सेवा बजावली.