सिल्लोड - पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्यामुळे अध्यक्षपदाचा मान मिळाल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी सिल्लोड येथे बोलताना केले. जिल्हा परिषद अध्यक्षपदी श्रीराम महाजन यांची निवड झाल्याने सिल्लोड व सोयगाव तालुक्यात त्यांचा सत्कार करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
सिल्लोड तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान मिळाल्याने त्यांचा विविध गावांमध्ये सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना महाजन बोलत होते. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकर पालोदकर, तालुका अध्यक्ष गणेश दौड, सोयगावचे प्रभाकर काळे, उपनगराध्यक्ष किरण पवार यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.