आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘श्रुती भागवत खुनाचा उलगडा होईलच’ - पोलिस उपायुक्त डॉ. जय जाधव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - परिश्रमांना नशिबाची साथ असल्यास अनेक गुन्ह्यांचा ताबडतोब उलगडा होऊ शकतो. अनेकदा पूर्ण परिश्रम घेऊनदेखील गुन्ह्याचा तपास लागत नाही. मात्र नशिबाची साथ मिळाल्यास एखाद्या लहान गोष्टीवरूनही मोठमोठ्या प्रकरणांचा तपास लागतो. त्यामुळे आज ना उद्या नरेंद्र दाभोलकर, श्रुती भागवत, सचिन खाडे यांच्या खुन्यांचा तपास नक्कीच लागेल, असा विश्वास पोलिस उपायुक्त डॉ. जय जाधव यांनी व्यक्त केला. डॉ. जाधव यांची बदली झाली असून यानिमित्त आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ.जय जाधव यांनी शहरात तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याने त्यांची नुकतीच पुणे येथील एसआरपी कमांडंटपदी बदली झाली आहे. आपल्या कारकीर्दीविषयी जाधव म्हणाले की, इतर ठिकाणचा अनुभव पाहता सोलापूरनंतर औरंगाबादेतील तीन वर्षांचा कार्यकाळ फार चांगल्या रीतीने पार पडला. सुपारी किलर इम्रान मेहदी प्रकरणाचा तपास लावल्याचे समाधान वाटते. ही उल्लेखनीय कामगिरी सहका-यांमुळेच पार पाडता आली, असेही त्यांनी नमूद केले.

औरंगाबाद शहरातील पत्रकारिता परिपूर्ण; चिखलफेक नाही

इतर ठिकाणी पोलिस अधिका-यांकडून काही चूक झाल्यास किंवा तपासात विलंब झाल्यास तेथील पत्रकार वैयक्तिकरीत्या चिखलफेक करतात. मात्र औरंगाबादेतील पत्रकारिता परिपूर्ण वाटली, अशी स्तुतीही त्यांनी केली. ते म्हणाले, वरिष्ठ अधिका-याची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तो उद्दिष्टानुरूप काम करत असतो. त्यामुळे खूप काही शिकण्यास मिळते. शहरात कोणत्याही अधिका-याशी मतभेद नव्हते, असे स्पष्ट करून ते म्हणाले की, सर्वच कर्मचारी तुमच्या बाजूने असतील असे नाही. चाळीस ऐकणारे तर साठ टक्के न
ऐकणारे असतात. यातील चाळीस टक्के कर्मचा-यांनी मने टिकवून साठ टक्के कर्मचारी आपल्याकडे वळवणे हे कौशल्य पणाला लावावे लागते. तीन वर्षात कोणताही राजकीय दबाव जास्त जाणवला नाही. मात्र तपास लवकरात होण्यासाठी दबाव आल्याची कबुलीही
त्यांनी दिली. या वेळी गुन्हे शाखेचे प्रभारी सहायक पोलिस आयुक्त अविनाश आघाव यांची उपस्थिती होती.