आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भावाचे प्रयत्न; श्रुती भागवत खुनाचा तपास नव्याने सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चारवर्षे झाली तरी श्रुती भागवत खून प्रकरणाचे गूढ पोलिसांना उकलता आले नाही. आपल्या बहिणीचे मारेकरी शोधून त्यांना फासावर लटकवा, अशी मागणी श्रुती यांचे बंधू मुकुल करंदीकर यांनी चार वर्षांपासून लावून धरली आहे. याची गांभीर्याने दखल घेत पोलिस महासंचालकांनी तपासासाठी विशेष एसआयटी पथक (विशेष तपास पथक) स्थापन करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांना दिले असून तातडीने पथकही स्थापन करण्यात आले आहे.
उल्कानगरीत राहणाऱ्या शिक्षिका श्रुती भागवत यांच्या हत्येचा तपास जवाहरनगर पोलिसांकडे होता. मात्र तपासात यश आल्याने गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात केली. मात्र चार वर्षे चार महिने उलटूनही खुनाचे गूढ उकलण्यात अपयश आले. त्यामुळे भागवत कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. परंतु पोलिस महासंचालकांनी ही मागणी फेटाळली होती. महिनाभरापूर्वी महासंचालकांनी शहर पोलिसांना विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश दिले.
यांचा समावेश : पोलिसमहासंचालकांच्या आदेशाने स्थापन पथकात पाेलिस उपायुक्त संदीप आटोळे, सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत सहायक पोलिस निरीक्षक भांगे यांचा समावेश आहे.
Ã-औरंगाबाद पोलिसांनीतपासासाठी विशेष पथकाची स्थापना केली ही गोष्ट समाधानकारक आहे. परंतु आधीच्या विशेष पथकाच्या हाती काहीच लागले नाही. आमचा पोलिस न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. नवीन पथकाकडून आम्हाला अपेक्षा आहेत. तरीही याप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी. तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच गृहमंत्रालयाकडे खुनाच्या तपासातील अपयशासंदर्भात पत्रव्यवहार करून सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर महिनाभरापूर्वी पोलिस महासंचालक कार्यालयाकडून पोलिस आयुक्तांना विशेष पथकाची स्थापना करण्याचे आदेश देण्यात आले, पण सीबीआय चौकशी व्हावी अशी माझी मूळ मागणी आहे. -मुकुल करंदीकर, श्रुती भागवत यांचे भाऊ

आणखी खुनांच्या तपासाचे आव्हान
आमिनाबी सुनीता चौगुले खून प्रकरणांच्या तपासाचे पोलिसांसमोर अद्याप आव्हान आहे. आमिनाबी यांची बेगमपुरा तर सुनीता चौगुले यांची कुंभेफळला हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील आरोपींचाही छडा लागला नाही.

अमितेशकुमार तिसरे पाेलिस आयुक्त
भागवत खून प्रकरण दाेेन पोलिस आयुक्तांनी हाताळले. आता अमितेशकुमार तिसरे आयुक्त आहेत. संजयकुमार, राजेंद्रसिंह यांच्या काळातही या प्रकरणात काहीच प्रगती झाली नाही. त्यामुळे अमितेशकुमार याचा छडा लावतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

३५० पेक्षा अधिक संशयितांची चौकशी
सुरुवातीला स्थानिक पोलिस ठाणे नंतर गुन्हे शाखेतर्फे जवळपास ३५० पेक्षा अधिक संशयितांची चौकशी करण्यात आली. भागवत यांच्या मोबाइल कॉल्सची पडताळणी करण्यात आली. परंतु पोलिसांना कोणतेच धागेदोरे सापडले नाही.

काय आहे प्रकरण ?
श्रुती भागवत या उल्कानगरी येथील श्रीनाथ अपार्टमेंटमध्ये एकट्या राहत होत्या. त्यांचे पती अरब देशात तर मुलगा पुणे येथे नोकरीला होते. १७ एप्रिल २०१२ रोजी श्रुती यांची हत्या करण्यात आली. फ्लॅटमध्ये सगळीकडे रक्ताचे डाग होते. त्यांचा मृतदेह ओढत नेऊन मागच्या बेडरूमच्या गॅलरीत नेऊन अर्धवटरीत्या जाळला. राज्यासह देशभरात हे खून प्रकरण गाजले. शहरात या हत्याकांडाविरोधात अनेक संघटना, महिला संघटनांची मोठी आंदोलने झाली.
बातम्या आणखी आहेत...