आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रुती कुलकर्णीच्या आत्महत्या: स्वप्निलचे ८०% कॉल श्रुतीने उचललेच नाहीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: - श्रुती कुलकर्णी
औरंगाबाद - श्रुती कुलकर्णीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी स्वप्निल मणियारचा नियमित जामीन अर्ज विशेष न्यायाधीश उत्तम तेलगावकर यांनी राखून ठेवला.
अटकेनंतर स्वप्निलने नियमित जामिनासाठी अॅड. सोमनाथ लढ्ढा यांच्यामार्फत अर्ज दाखल केला. सरकारच्या वतीने विशेष सहायक लोकअभियोक्ता अॅड. के. जी. भोसले यांनी युक्तिवाद केला. स्वप्निलने श्रुतीला धमकाविण्यासाठी, अश्लील एसएमएस पाठवण्यासाठी अमोल कारभारीचा मोबाइल वापरला होता. त्याने जुलै २०१५ ते १६ ऑगस्ट २०१५ दरम्यान केलेल्या कॉलपैकी ८० टक्के कॉल तिने घेतलेलेच नाहीत. जे कॉल घेतले, त्यात त्याने शिवीगाळ केल्याचे सीडीआरच्या रेकॉर्डमध्ये आहे. त्याला जामीन दिल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो. त्यामुळे त्याला जामीन देऊ नये, अशी विनंती केली.
बातम्या आणखी आहेत...