आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हैसमाळ-खुलताबाद -वेरूळ शूलीभंजनचे दोन वर्षांत भाग्य उजळणार, दोन वर्षांत ४५३ कोटी रुपये खर्च करून विकास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - म्हैसमाळ-खुलताबाद-शूलिभंजनपर्यटन प्राधिकरणाला ४५३ कोटी रुपयांचा निधी मंगळवारी औरंगाबादेत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केला आणि त्याचबरोबर शहराला लागूनच नवीन पर्यटन केंद्राच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. येत्या दोन वर्षांत या परिसराचा कायापालट झालेला असेल, असा दावा या प्राधिकरणासाठी आग्रह धरणारे आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे.

४५३ कोटी रुपयांच्या निधीतून सर्वप्रथम या चारही गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. त्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल. ठिकठिकाणी पर्यटकांना थांबण्यासाठी सभागृहे (हॉल) असतील. खुलताबाद परिसरात पुरातन असे हत्ती तसेच घोडे धुण्याचे सात तलाव आहेत. आता दुर्लक्षित असलेल्या या तलावांचा विकास केला जाईल. परियोंका तलावही नव्या रुपात समोर येईल. शूलिभंजन येथील सूर्यकुंड चंद्रकुंडही नव्या रुपात नागरिकांना दिसेल. त्यामुळे आपोआपच येथील गर्दी वाढेल. सध्या पावसाळ्यात या भागाला शहरातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात.

या पर्यटनस्थळाला जोडणारे रस्ते विकसित झाले तर आपोआपच औरंगाबादकरांचा या परिसराकडे ओढा वाढणार आहे. वेरूळ येथे घृष्णेश्वराच्या तर खुलताबाद येथे भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी वरील स्थळे दर्शनीय ठरणार आहेत.

निधीच्याअडचणीमुळे झाले वेगळे प्राधिकरण : पूर्वीजिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांसाठी एकच प्राधिकरण होते. त्याच्या विकासासाठी एकत्रित मागणी केली की निधीचा आकडा मोठा दिसायचा. त्यातच अन्य लोकप्रतिनिधी पर्यटनस्थळांच्या विकासाला जास्त महत्त्व देत नव्हते. त्यामुळे बंब यांनी वरील चार पर्यटनस्थळांसाठी वेगळे प्राधिकरण हवे, ही मागणी पुढे केली. पहिल्या पांचवार्षिकमध्ये त्यांचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सख्य होते. त्याचा वापर करून त्यांनी म्हैसमाळ-खुलताबाद-वेरूळ- शूलिभंजन प्राधिकरण गठित करून घेतले. जिल्हा प्राधिकरणापासून हे प्राधिकरण वेगळे झाल्यापासून निधीसाठी प्रयत्न सुरू झाले होते. त्याला आता यश आले.

एकदिवसाचा टुरिस्ट टूर शक्य : याचारही पर्यटनस्थळांचा विकास झाला तर औरंगाबादकरांसाठी एक दिवसाचा टुरिस्ट टूर शक्य होईल. यात उद्याने, थांबण्याची व्यवस्था, व्ह्यू पाॅइंट, मुलांसाठी खेळण्याची व्यवस्थ शक्य होईल.

प्राधिकरणकरण्यात यश : मीयासाठी ससत प्रयत्न करतोय. अखेर मला यश आले. आता निधीही मिळाला. दोन वर्षांत या परिसराचा कायापालट होईल, असे आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले.
असा होईल खर्च
७५ कोटी पिण्याच्या पाण्यासाठी
१२९ कोटी रस्ते तसेच पथदिव्यांसाठी
१०० कोटी पुष्पोद्याने तसेच पर्यटकांसाठी सभागृहे-
५० कोटी परियोंका तालाब, शूलिभंजन येथील सूर्य चंद्रकुंड, व्ह्यू पॉइंट याच्या विकासासाठी
पुढील स्लाईडवर पाहा, कसा असेल विकासाचा आलेख
बातम्या आणखी आहेत...