आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - श्वेता बोरसे आत्महत्या प्रकरणी आरोपी देवेश दत्ता पाथ्रीकर याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजीराव कचरे यांनी ही शिक्षा सुनावाली. देवेश औरंगाबादमधील काँग्रेसचे नेते प्रा. डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर यांचा मुलगा आहे.
सिडको एन-४ परिसरात राहाणा-या उच्चशिक्षित श्वेता विनायक बोरसे हिने(२२) ३१ डिसेंबर २००५ रोजी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली होती. त्याआधी तिने सात पानी मृत्यूपत्र लिहून ठेवले होते. देवेश पाथ्रीकरने (२८) अश्लिल फोटो काढून ब्लॅकमेलिंग करत असल्याचे मृत्यूपत्रात लिहिले होते. देवेशच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे श्वेताने लिहिले होते. त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप देवेशवर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी त्याला मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली होती. श्वेताचे हस्ताक्षर असलेल्या वह्या आणि मृत्यूपूर्वी लिहिलेले पत्र हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठवण्यात आले होते. हस्ताक्षर तज्ज्ञांच्या अहवालानुसार तिने लिहिलेल्या सात पानी मृत्यूपत्रातील अक्षर तिचेच असल्याचे सिद्ध झाले होते. त्यानुसार पोलिसांनी देवेशविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणी १० साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम ३०६ नुसार आरोपी देवेश पाथ्रीकरला तीन वर्षांची कैद आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.