आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shyam Manohar Awarded For Lifetime Achievement Award

श्याम मनोहर यांना जीवनगौरव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महाराष्ट्रफाउंडेशनच्या वतीने साहित्यासाठी देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार श्याम मनोहर यांना तर समाजकार्यासाठी देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार पुष्पा भावे यांना जाहीर झाला आहे. दोन लाख रुपये आणि स्मृतिचनि्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी मंडळींनी स्थापन केलेल्या फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात.

महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी सामाजिक आणि साहित्य विषयात एकूण दहा पुरस्कार दिले जातात. पूर्वी या पुरस्काराचे संयोजन मुंबई येथील केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या वतीने करण्यात येत होते. गेल्या सहा वर्षांपासून या पुरस्काराचे संयोजन पुणे येथील साधना ट्रस्टच्या वतीने केले जाते. मंगळवारी विजय दिवाण यांनी या पुरस्काराबाबतची माहिती दिली.
दाभोलकरपुरस्कार निखिल वागळेंना : डॉ.नरेंद्र दाभोलकर पुरस्कार गेल्या वर्षीपासून दिला जात आहे. यापूर्वी विवेक सावंत यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. या वर्षी पत्रकार निखिल वागळे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि स्मृतिचनि्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, तर तिघांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात प्रबोधन विभागात रमेश गावस (गोवा), सामाजिक प्रश्न विभागात बिंदुमाधव खरे ( पुणे) आणि असंघटित कष्टकरी विभागात मनीषा तोकले (बीड) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. तर तीन ग्रंथ पुरस्कारांमध्ये महाबळेश्वर सैल यांना "तांडव' कादंबरीसाठी विशेष ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे. किरण गुरव यांच्या "राखीव सावल्यांचा खेळ' या कादंबरीसाठी ललित ग्रंथ पुरस्कार, तर अरुण खोपकर यांना "चित्रव्यूह' पुस्तकासाठी अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे. १० जानेवारी रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.