आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"श्यामची आई' नाट्यप्रयोग आज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - साने गुरुजी जयंतीनिमित्त १९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता तापडिया नाट्यमंदिरात "श्यामची आई' या बालनाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
या नाटकाची निर्मिती नाट्यसेवा बाल विभाग नाशिक यांनी केली आहे. दिग्दर्शन महेश डोकफे यांनी केले असून यात गणेश सरकटे, मयूरी विसपुते, मंगेश परमार, प्रशांत धात्रक, सोहम परदेशी, नीलेश बिर्ला, निलय शुक्ल, तनीश वाघमारे, अनिकेत कुलकर्णी, मानसी सूर्यवंशी, कृतार्थ कंसारा, अजय तारगे, अश्विनी शिरसाठ, स्वप्नज वाघ, सोहम महाजन, दामिनी जाधव, गौरी कदम आदी बालकलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. आजपर्यंत महाराष्ट्रात या नाटकाचे ९०० प्रयोग झाले आहेत. नाटकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पवन गायकवाड यांनी केले आहे.