आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Siddharth Garden Lion Rohini Passes Away Aurangabad

आजारी सिंहिणीने घेतला जगाचा निरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्राणिसंग्रहालयातील रोहिणी या आजारी सिंहिणीचा अखेर शुक्रवारी सायंकाळी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. 23 वर्षांची रोहिणी या प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण होती.

आबालवृद्धांचे आकर्षण असणार्‍या प्राणिसंग्रहालयात 286 प्राणी आहेत. त्यापैकी 23 वर्षांच्या रोहिणी या सिंहिणीचा प्राणिसंग्रहालयातच जन्म झाला. जहाँगीर आणि तारा या सिंहांच्या जोडप्यापासून ती जन्मली. वयोमानानुसार थकलेल्या रोहिणीने मागील काही दिवसांपासून तिने आपणहून खाणे बंद केले होते. पिंजर्‍यता बसून राहणार्‍या या सिंहिणीला ताकद यावी यासाठी टॉनिक दिले गेले. खिमा हाताने भरवावा लागत होता. तिचा आहारही कमी झाला होता. 25 ऑगस्टपासून तिच्या देखभालीत वाढ करण्यात आली होती. पण शुक्रवारी तिने अखेर प्राण सोडला. प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले की, शवविच्छेदनासाठी या सिंहिणीचा मृतदेह पशुवैद्यकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आला असून अंत्यसंस्काराआधी पंचनामा करण्याबाबत वन खात्याला कळवण्यात आले आहे.