आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी सिध्‍दार्थ उद्यानातील लॉन खोदली - प्रा. दिवाण यांचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समांतरपाणीपुरवठा योजना तसेच भूमिगत गटार योजनेच्या कामाचा शुभारंभ सदि्धार्थ उद्यानात का करण्यात आला, याचा उलगडा कोणालाही होऊ शकला नाही. थेट उद्यानाच्या हिरवळीवरच झालेल्या या कार्यक्रमामुळे एक वर्षापासून जोपासण्यात आलेली सुमारे तीन लाख रुपये किमतीची हिरवळ नष्ट झाली.

नव्याने हिरवळ तयार करण्यासाठी पैसे खर्च होणार तर आहेच पण ती तयार होण्यासाठी काही महनि्यांचा कालावधी लागणार आहे. २००७ पासून उद्यानातील मोठी झाडे तोडली आहेत. जी माणसे वर्षानुवर्षे जगणारी झाडे एका फटक्यात तोडू शकतात त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय ठेवणार, ते कसली निसर्गाची चिंता करणार अशी टीका पर्यावरण तज्ज्ञ प्रा. विजय दिवाण यांनी केली आहे. कार्यक्रमासाठी दहा हजार चौरस फुटांवर पत्र्यांचा मंडप टाकण्यात आला होता. त्यासाठी जागोजागी खड्डे खोदण्यात आले. त्यातच प्रेक्षकांच्या येरझाऱ्यामुळे सर्वत्र चिखल झाला अन् सर्व हिरवळ नष्ट झाली. एवढी हिरवळ तयार करण्यासाठी आता किमान तीन लाख रुपये खर्च येईल शिवाय त्यासाठी काही महनि्यांचा कालावधी लागेल. त्या काळात ही हिरवळ उद्यानात येणाऱ्यांसाठी बंद राहील, जोपासलेली हिरवळ अशा पद्धतीने नष्ट होणे चांगले नसल्याचे निवृत्त उद्यान अधीक्षक जनार्दन भडके यांनी म्हटले आहे.

उद्यानात कार्यक्रम घेण्यात आल्याने वर्षभरापासून जोपासलेली हिरवळ नष्ट झाली आहे.
येथे होऊ शकला असता हा कार्यक्रम

पालिकेच्यामालकीचे संत एकनाथ किंवा संत तुकोबाराय नाट्यगृह. नक्षत्रवाडी किंवा थेट नाथसागराजवळ. दोन्हीही नाट्यगृहे पालिकेच्या मालकीची आहेत. त्यासाठी पालिकेला एक छदामही खर्च आला नसता. झाडे तोडावी लागली नसती किंवा हिरवळीवरही खराब झाली नसती.
हे तर षड््यंत्र
*२००७पासून उद्यानाचे क्षेत्रफळ कमी करण्याचे षड््यंत्र रचण्यात आले आहे. साडेबारा हजार चौरस फुटांवर पार्किंग उभारण्यात आले. त्यासाठी शेकडो झाडे तोडली. त्यानंतर पक्के बांधकाम करण्यात आले. आता हिरवळ ते कशाला ठेवतील. जनता जाब विचारणार नाही तोपर्यंत हे असेच सुरू राहणार? प्रा.विजय दिवाण, पर्यावरणतज्ज्ञ.

लॉनपूर्ववत करू
*सिध्‍दार्थ उद्यानातील खोदलेली लॉन दोन दिवसांत पूर्ववत केले जाईल. तशा सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सोमवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल. डॉ.हर्षदीप कांबळे, आयुक्त,मनपा