आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खबरदार...यापुढे झाडांना हात लावाल तर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - झाडे,पक्षी यांना कुणीच वाली नाही, असे समजू नका. खबरदार... यापुढे झाडांना हात लावला तर कायदा काय असतो ते दाखवून देऊ, असा खणखणीत इशारा पर्यावरणप्रेमी संस्था, संघटना आणि "दिव्य मराठी' च्या पुढाकाराने आयोजित मूक मोर्चाद्वारे गुरुवारी देण्यात आला. रेल्वेस्थानक परिसरात तीन दिवसांपूर्वी झाड तोडून निष्पाप बगळ्यांचा जीव घेतल्याच्या निषेधार्थ हा मूक मोर्चा काढण्यात आला. ग्रीन औरंगाबाद फोरमच्या माध्यमातून पर्यावरणप्रेमी संघटना एकत्र आल्या होत्या. यापुढेही अशा प्रवृत्तींविरुद्ध एकजुटीने काम करण्याचा एल्गार या वेळी पुकारण्यात आला.

रेल्वेस्टेशनच्या वाहनतळातील चाळीस वर्षे जुने िचंचेचे झाड रेल्वे प्रशासनाच्या पुढाकाराने तोडण्यात आले. बगळ्यांची विष्ठा गाड्यांवर पडते, या क्षुल्लक कारणावरून हे झाड तोडल्याने बगळ्यांची घरटी मोडली. अंडी पिले जमिनीवर पडली. यात अनेक पिले मेली, तर शेकडो अंडी फुटली. याच्या निषेधार्थ शहरातील पर्यावरण प्रेमी पक्षिप्रेमी संघटनांनी रेल्वेस्थानक ऑटो पार्किंग ते तोडलेले झाड, असा मूक मोर्चा काढून रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदवला. तसेच मेणबत्त्या पेटवून मृत बगळ्यांना श्रद्धांजली वाहिली. या वेळी वुई फाउंडेशनच्या मेघना बडजाते यांना अश्रू अनावर झाले.
मूकमोर्चात उपस्थिती : मेघनाबडजाते, प्रीती शाह, दिलीप यार्दी, डॉ. किशोर पाठक, निर्मलदादा, गरवारे कम्युनिटी सेंटरचे सुनील सुतवणे, पोलिस सैनिकी प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक राजेश पाटील, नाट्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी प्रीतम चव्हाण, मिलिंद गिरधारी, विकास खांडेकर, माधव कल्याणी, सारंग पटेल, गोविंद कुलकर्णी, रवी चौधरी, प्रशांत जोशी, विनोद व्यवहारे, अभिषेक पगारे, सपना कुलकर्णी, मनोज शाह, राजेश बंग, मनीषा चौधरी, राम मोरे, विक्रम आहेर, रोहिणी कारखाने,
शहरातया पुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी वुई फाउंडेशन, ग्रीन औरंगाबाद फोरम, गरवारे कम्युनिटी सेंटर, शिवनेरी मित्रमंडळ, एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाउंडेशन, इको नीड फाउंडेशन, पोलिस-सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था, प्रयास, लोकशाहीर विश्वास साळुंके प्रतिष्ठान, जीवन आशा ग्रुप, वसंुधरा एन्व्हायर्नमेंटल, बर्ड््स वॉचर्स ऑफ औरंगाबाद, तेली युवा संघटना, पगमार्क्स, क्षत्रिय राठोड सेवाभावी संस्था, जैन इंजिनिअर्स सोसायटी, निसर्ग मित्र मंडळ, दीपशिखा फाउंडेशन आदी संस्था, संघटनांनी एकजूट होण्याचा निर्धार केला.

गुन्हे दाखल व्हावेत
केवळबगळ्यांची विष्ठा पडते म्हणून झाड तोडले जाते, हे ऐकूनच संताप येतो. अशा प्रवृत्तींविरुद्ध गुन्हे दाखल झालेच पाहिजेत. दिलीपयार्दी, एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाउंडेशन

रेल्वेप्रशासन गुन्हेगार
यापुढेशहरात अशा घटना घडणार नाहीत, याची काळजी घ्यावी. विविध किटकांची अन्नसाखळी बनलेले हे झाड तोडून रेल्वे प्रशासनाने गुन्हा केला आहे. डॉ.किशोर पाठक, सृष्टीसंवर्धन संस्था.