आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sillod, Paithan, Pachod, Khultabad Sonography Center Investigation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्व काही आलबेल: सिल्लोड, पैठण सोनोग्राफी केंद्राची तपासणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड: शहरातील तीन सोनोग्राफी, दोन गर्भपात केंद्रांची तपासणी आरोग्य पथकाने मंगळवारी केली असता सर्व काही आलबेल असल्याचे वैद्यकीय अधीक्षक आर. जी. जाधव यांनी सांगितले.
स्त्री भ्रूणहत्येच्या उठलेल्या वावटळीत आपण सापडू नये यासाठी प्रत्येक जण प्रयत्नात आहे. स्त्री भ्रूणहत्या रोखण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे आजच्या शहरात सुरू असलेल्या आरोग्य पथकाच्या तपासणीतून स्पष्ट झाले. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आर. जी. जाधव, निवासी नायब तहसीलदार आर. वाय. कुलकर्णी, पोलिस निरीक्षक रामकृष्ण तायडे व त्यांच्या सहकार्‍यांनी मंगळवारी शहरातील आनंद हॉस्पिटल, र्शीगणेश मंडलेचा डायग्नॉस्टिक सेंटर व शहा हॉस्पिटलच्या सोनोग्राफी केंद्रांची, तर शहा जयस्वाल व झलवार हॉस्पिटलच्या गर्भपात केंद्राची तपासणी या पथकाने केली. या तपासणीत आक्षेपार्ह प्रकार आढळला नसल्याचे डॉ. आर. जी जाधव यांनी सांगितले.
पथकाने दफ्तर तपासणी केली. सोनोग्राफी किंवा गर्भपात करणार्‍या महिलेने संमतिपत्र व शासकीय नियमाप्रमाणे माहिती विहित नमुन्यात भरलेली आहे का हे तपासण्यात आले. मात्र, महिलांच्या नावांविषयी काहीही खात्री होत नसल्याने आढळून आले. त्या केवळ औपचारिकता पूर्ण करणे हाच तपासणीचा हेतू होता की काय, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
पाचोडला 15 रुग्णालयांची तपासणी
पाचोड: बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या स्त्री-भ्रूणहत्या मालिकेची प्रशासनाने गंभीर दखल घेत मंगळवारी प्रशासनाच्या आदेशानुसार पाचोड येथील 15 रुग्णालयाची चौकशी करण्यात आली. या रुग्णालयाची सहायक पोलिस निरीक्षक डी. जी. चिखलीकर व वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजी भोजने यांनी सहकार्यसमवेत तपासणी केली. मात्र, येथे असा काहीच प्रकार होत नसल्याचे आढळून आले. या पथकामध्ये पोलिस निरीक्षक चिखलीकरसह, डॉ. शिवाजी भोजने, डॉ. राहुल ढवळे, डॉ. आनंद तारु, गणेश मांगुळकर आदीचा समावेश होता.
रिकाम्या हाताने पथक परतले
पैठण: स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी मुख्य सचिव यांनी सोनोग्राफी सेंटर्स तपासण्याचे आदेश दिल्यानंतर पैठण शहरात तहसीलदार राजीव शिंदे, डॉ. अंजली देशपांडे, पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांच्या पथकाने शहरातील सोनोग्राफी सेंटर व दवाखान्यांची तपासणी केली. याकारवाईत काहीच निष्पन्न झाले नसल्याचे पथकातील अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र, सोनोग्राफी सेंटरचालक धास्तावल्याचे दिसून आले.
औरंगाबादमध्‍ये 2 रुग्णालयांचे सोनोग्राफी सेंटर्स सील
धुळे शहरात वर्षात 20 सोनोग्राफी केंद्रांची मान्यता रद्द
जळगावातील दोन सोनोग्राफी मशीन सील