आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरातीत नाचण्यावरून वाद, ४८ जणांवर गुन्हे दाखल, पानस येथील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - लग्नाच्या वरातीत डीजेसमोर नाचण्यावरून रहिमाबाद येथील शिंदे व नवल गटात झालेल्या वादाचे पर्यवसान मारामारीत झाल्याने परस्परविरोधी तक्रारीवरून ४८ जणांवर दंगल केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रहिमाबाद येथील वऱ्हाड लग्नासाठी शुक्रवार, दि. २२ रोजी सिल्लोड तालुक्यातील पानस येथे गेले असता डीजेच्या तालावर नाचताना एकमेकांना धक्का लागण्यावरून निर्माण झालेला वाद गावातील ज्येष्ठांनी सामंजस्याने प्रकरण हाताळल्याने मिटवण्यात आला. परंतु रात्री रहिमाबाद येथे परतल्यानंतर शिंदे व नवल गटात पुन्हा वादाला सुरुवात होउन प्रकरण लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यापर्यंत गेले. शनिवार, दि. २३ रोजी शिवाजी लक्ष्मण शिंदे (वय ४७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जणांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. शिंदे यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रहिमाबाद येथील बसस्थानकावर आरोपींनी दि. २२ रोजी रात्री नउ वाजण्याच्या सुमारास टाटा सुमो (एमएच २० सीएस ६१२७) जीप अडवून लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून गाडीच्या काचा फोडल्या व विलास मन्साराम शिंदे याच्या डोक्यात लोखंडी सळईने वार करून जखमी केले.
अन्य आरोपींनी वाहनातील दोन महिलांची वाईट हेतूने छेडछाड करून मारहाण केली. यावरून पोलिसांनी शनिवार, दि. २३ रोजी नागेश नवल, सुभाष नवल, सोनू पंढरीनाथ नवल, बालाजी नवल, राजू नवल, योगेश शेनफड नवल, शरद मोळवंदे, योगेश माधव नवल, गणेश मंजीतराव नवल, गणेश विश्वनाथ नवल, संजय नवल, राहुल नवल, अमोल नवल, सचिन नवल, पंढरीनाथ नवल, समाधान शिरसाठ, उमेश नवल, मनोहर नवल, ज्ञानेश्वर नवल, ज्ञानेश्वर सेमीनाथ नवल, योगेश आनंदा शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली.
तर उमेश माधवराव नवल (वय २८, रा. रहिमाबाद) याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दोन महिलांची छेड काढून मारहाण केली. या तक्रारीवरून विलास शिंदे, शिवाजी शिंदे, दिलीप चिंचपुरे, सुनील खराडे, विष्णू चिंचपुरे, प्रल्हाद नामदेव भुते, गणेश शिंदे, कृष्णा मन्साराम, प्रल्हाद भुते, बालाजी शिंदे, अंकुश गाढवे, मनोहर शिंदे, अर्जुन शिंदे, गोलू भुते, दत्तू शिंदे, कैलास शिंदे, सचिन शिंदे, त्र्यंबक गाढवे, पोपट शिंदे, पिराजी शिंदे, अंकुश शिंदे, नितीन शिंदे, सागर शिंदे, देविदास शिंदे, रामदास शिंदे, सुदाम शिंदे, मल्हारी शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. दोन्ही तक्रारींमधील आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता जामिनावर मुक्तता केली.
किन्हीत वाद, ११ जणांविरोधात गुन्हा
सोयगाव | तालुक्यातील किन्ही येथे डॉ. अांबेडकर जयंतीत का नाचतोस यातून वाद उद्भवला. याप्रकरणी शनिवारी सोयगाव पोलिस ठाण्यात ११ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. किन्ही येथे दि. १४ एप्रिल रोजी मिरवणुकीत मधुकर किसन जाधव नाचत असताना मनोहर शेळके याने वाद घालत मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी राज गिरधन जाधव गेले असता, मनोहर शेळके यांनी लोखंडी रॉडने तर तुळशीराम शेळके , किशोर शेळके, महेंद्र शेळके, वामन शेळके, पंडित शेळके, संतोष शेळके, समाधान शेळके, भुराबाई शेळके, ज्योती शेळके, छायाबाई शेळके यांनीदेखील मारहाण केली.