आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेवराईमध्ये ८०० सिमकार्ड जाळले, पाेलिस अधीक्षक करणार चाैकशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई - गेवराईतील मोबाइल सिमकार्ड विक्रेत्यांना पोलिसांनी दंडेलशाहीची भाषा वापरल्याने गुरुवारी दुपारी वाजता शिवाजी चौकात तब्बल अाठशे सिमकार्डची होळी करून पोलिसी इशाऱ्याला प्रत्युत्तर दिले. पाेलिस अधीक्षक अनिल पारसकर याप्रकरणी चाैकशी करणार अाहेत.

गेवराई शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र गंदम यांनी गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास शहरातील सिमकार्ड विक्रेत्यांची एक बैठक बोलावली होती. आयोजित बैठकीत गंदम यांनी बोलताना जर छेडछाडीसारखे गंभीर गुन्हे दाखल झाले तर ज्या सिमकार्ड विक्रेत्यांकडून संबंधितांनी सिमकार्ड खरेदी केलेले आहे अशा व्यक्तीच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा गंदम यांनी बैठकीत दिला. पोलिस निरीक्षक गंदम यांनी थेट गुन्हे नोंदवण्याची भाषा केल्याने शहरातील सिमकार्ड विक्रेत्यांत संतापाची लाट उसळली. मोबाइल कंपनीच्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीने संपूर्ण कागदपत्रे दिल्यानंतर त्यांची खातरजमा करून सिमकार्ड देणे हा आमचा व्यवसाय आहे. नंतर तो सिमकार्ड धारक कशा पद्धतीने सिमकार्डचा वापर करतो कोणाशी बोलतो याचा आणि सिमकार्ड विक्रेत्यांचा काहीही संबंध नसतो असे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे सिमकार्ड विक्रेत्यांना जबाबदार धरण्याचा प्रकार संतापजनक असल्याची भावना सिमकार्ड विक्रेत्यांनी व्यक्त केली. दरम्यान, पाेिलस निरीक्षक सुरेंद्र गंदम यांनी सांगितले की, विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या. सिमकार्ड खरेदीदाराची सविस्तर माहिती घेऊनच सिमकार्ड दिले पाहिजेत. विक्रेत्यांना काही संशय आला तर आमच्याशी संपर्क साधावा. गुन्हेगारीवर आळा बसेल.

जबाबदार धरू नये
^सिमकार्डविक्री करताना आम्ही खरेदीदाराकडून कागदपत्रे घेऊनच ते देत आहोत. ग्राहक सिमकार्डाचा कसा वापर करतो याचा आणि सिमकार्ड विकणाऱ्याचा काही संबंध नसून ज्या ग्राहकांनी सिमकार्डाचा दुरुपयोग केला त्यास जबाबदार धरावे मात्र विक्रेत्यांना जबाबदार धरण्याचा प्रकार संतापजनक आहे.'' जितेंद्र मुंदडा , सिमकार्ड,विक्रेता गेवराई

चौकशी केली जाणार
^आम्हीया प्रकरणी एक सिस्टिम सुरू केलेली आहे. सध्या विविध योजनेसाठी वृद्ध लोक आधार कार्ड घेऊन जातात. अशा वेळी काही लोक वृद्धाकडील आधार कार्डचा गैरवापर करून त्यांच्या नावावर सिमकार्ड खरेदी करतात. काही ठिकाणी सिमकार्ड मोफत वाटले जातात. गेवराईच्या प्रकरणात चौकशी करण्यात येईल.'' अनिलपारसकर, पोलिस अधीक्षक,बीड