आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएस कार्यालय उडवण्यासाठी अबू फैझल झाला होता फरार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मध्य प्रदेशच्या खांडवा तुरुंगातून पसार झाल्यानंतर पकडण्यात आलेला सिमीचा हस्तक अबू फैझल हा औरंगाबाद एटीएसचे कार्यालय आणि अधिकार्‍यांना उडवण्यासाठीच साथीदारांसह पसार झाला होता. गुप्तचर यंत्रणेकडे याबाबतची माहिती प्राप्त झाली होती, असे एका पोलिस अधिकार्‍याने सांगितले. फैझलने यापूर्वीच एटीएसचे कार्यालय आणि अधिकार्‍यांना उडवण्याची धमकीदेखील दिली होती.

रोजाबागमध्ये 26 मार्च 2012 मध्ये अतिरेकी आणि एटीएसमध्ये चकमक उडाली होती. यामध्ये अझर कुरेशी हा अतिरेकी ठार झाला होता. यानंतर पोलिसांनी अखिल खिलजी, खलील खिलजी, अबरार ऊर्फ मुन्ना बाबू खान यांना पकडले होते. याचदरम्यान त्याला गुजरात पोलिसांनी बॉम्ब स्फोट प्रकरणी चौकशीसाठी नेले होते. त्याच्या चौकशीसाठी औरंगाबाद एटीएसचे तत्कालीन पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे व उपनिरीक्षक गोरख जाधव गुजरातला गेले असता फैझलने त्यांना धमकी दिली होती.