आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ वर्षांपासून इंग्लंडच्या डॉक्टरांची कोकणात सेवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - इंग्लंडच्या तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांनी कोकणातील गरीब रुग्णांच्या सेवेचा ध्यास घेतला आहे. सलग आठ वर्षांपासून ही डॉक्टर मंडळी देरवण येथे रुग्णांवर मोफत अत्याधुनिक उपचार करीत आहेत. आजतागायत त्यांनी दोन हजारांवर शस्त्रक्रिया केल्या असून, सुमारे 50 लाखांचे वैद्यकीय साहित्यही मोफत दिले आहे.

मूळ औरंगाबादचे निवासी व गेल्या 22 वर्षांपासून इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले प्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. संजय देशपांडे या उपक्रमामध्ये मुख्य समन्वयकाची भूमिका बजावत आहेत. चिपळूणपासून 18 कि.मी.वर विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या बी.के. वालावलकर हॉस्पिटलमध्ये 2006 पासून हा उपक्रम सुरू आहे. डॉ. देशपांडे यांचे एक मित्र हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्याकडून गोरगरीबांच्या दृष्टीने अशा प्रकारचा उपक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यानंतर डॉ. देशपांडे यांच्या इंग्लंडमधील परिचित डॉक्टरांनी पुढे येऊन उपक्रमात सहभागी होण्याचा मनोदय व्यक्त केला. 2006मध्ये असलेली 11 डॉक्टरांची टीम आता 25 पेक्षा जास्त डॉक्टरांवर गेली आहे.

सहा दिवसांचे प्रशिक्षण शिबिर
कोकणातील डॉक्टरांसाठी, नर्स व तंत्रज्ञांसाठी खास प्रशिक्षण शिबिरही घेतले जात आहे. परिणामी हॉस्पिटलमधील तसेच कोकणातील डॉक्टर-परिचारिका-तंत्रज्ञ प्रशिक्षित झाले आहेत. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या वतीने हे प्रशिक्षण पूर्ण करणा-यांना प्रमाणपत्रही दिले जाते.