आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन करण्‍यासाठी जाणाऱ्या बहीन भावावर काळाचा घाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड- शहरालगत असलेल्या हरिओम जिनिंग प्रेसिंगसमोर दुचाकी व बसच्या घडक होऊन झालेल्या अपघातात बुधवारी बहीण-भाऊ जागीच ठार झाले.  
मंगरूळ (ता. सिल्लोड) येथील कारभारी (१९)  व मनकर्णा देविदास  सागरे (१७) हे दोघे बहीण-भाऊ  बुधवाररी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास सिल्लोड-अजिंठा रस्त्यावरून मंगरूळकडे  जात असताना त्यांची दुचाकी व अजिंठ्याकडून सिल्लोडकडे येणाऱ्या रावेर-पुणे बसची  सिल्लोड शहरालगत असलेल्या हरिओम जिनिंग प्रेसिंगसमोर जोरदार धडक झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. मनकर्णा हिचे जातीचे प्रमाणपत्र ऑनलाइन करण्यासाठी कारभारी तिला सिल्लोडला घेऊन आला होता.  घरी जाताना हा अपघात झाला. 
बातम्या आणखी आहेत...