आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावासाठी बहिणीची कठाेर तपश्चर्या, आजारपणाला बरे करण्‍यासाठी शर्थीचे प्रयत्‍न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अवघी 3 फूट उंची असलेल्या, पण अभ्यासात अन् वाक्चातुर्यात तरबेज असलेल्या तसबीर रावण गोंडे (२६) या भावाला वाचवण्यासाठी बहीण संगीता गोंडे (३७) शर्थीचे प्रयत्न करत आहे. दोघांचीही उंची 3 फुटांच्या आतच, पण त्यांचा संघर्ष किती तरी मोठा आहे. भाऊबिजेच्या दिवशी पाणावल्या डोळ्यांनी संगीता घाटीच्या वॉर्ड क्रमांक १७ मध्ये भावाची सेवा करत होती. परिचारिकांनी तिला धीर देत ‘होईल तुझा भाऊ बरा, काळजी करू नकोस,’ असा आशावाद दिला. त्यावर भावुक होत ‘तुमची वाचा सोन्याची होवो अन् माझ्या भावाला आरोग्य लाभो, असे बहीण म्हणाली अन् वॉर्डातील प्रत्येकाला हळवे करून गेली. 
 
करमाडच्या भांबाडा गावातील हे दोघे बहीण-भाऊ मागील दिवसांपासून घाटीत आहेत. रावण गोंडे हे भविष्य पाहून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना आणखी दोन मुले आणि दोन मुलीही आहेत. हे दोघे मोठे बहीण-भाऊ एकाच उंचीचे आहेत. संगीताचा तसबीरमध्ये खूप जीव आहे. तसबीर १२ वीपर्यंतच शिकलेला असून ६५ टक्के गुणांनी पास झाला. विशेष म्हणजे आजारपणातही त्याचे वाक्चातुर्याचेे कसब दाद देण्यासारखे आहे. घरची दरिद्री परिस्थिती आणि शारीरिक व्यंगावर मात करत त्यांचा आयुष्याचा संघर्ष सुरू होता. दोन वर्षांपूर्वी बकरी चारून आणल्यावर तसबीरच्या पायाला मार लागला. डॉक्टरांनी प्लास्टर केले. पण अंथरुणावर खिळून राहिलेल्या तसबीरला बेडसोअर होऊ लागले. जखमा वाढत गेल्या अन् हातापायांतील ताणही निघून गेल्याने घाटीत हलवण्यात आले. तसबीरचे फुप्फुस बारीक असल्याने हृदयाच्या तपासण्या सुरू आहेत. बेताच्या आर्थिक स्थितीमुळे घाटीतील उपचारांत के. के. ग्रुपच्या वतीने या भावाबहिणीला मदत केली जात आहे. औषधे आणि वॉटरबेड देण्यात आला आहे. ग्रुुपचे अध्यक्ष अकिल अहमद, किशोर वाघमारे, जुनेद शेख, महंमद आसेफ, जमीर पटेल शक्य ती मदत केली आहे. 
 
बहिणीची माया पाहून आम्हीही भारावलो 
या दोघा बहीणभावाची उंची अवघी 3 फूट आहे. पण भावाला बरे करण्यासाठी बहीण जीवतोड मेहनत करत आहे, हे पाहून आमचेही डोळे भरून आले. 
- अकिल अहमद, अध्यक्ष के के ग्रुप 
 
बातम्या आणखी आहेत...