आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा महिन्यांचे तान्हुले खुलताबादेत सापडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद- उरूस मैदानालगतच्या गायरानात शनिवारी दुपारी अज्ञात व्यक्तीने सहा महिन्यांच्या तान्हुल्याला सोडले. रडण्याच्या आवाजाने एका दहावर्षीय मुलाने पोलिसांच्या मदतीने बाळाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. बाळ कुणाचे, कुणी सोडले याचा तपास पोलिस करत आहेत.

राजीव गांधीनगर येथील अब्बू सलीम बेग हा दहा वर्षांचा मुलगा शनिवारी १२ वाजेदरम्यान वडिलांसोबत जनावरे चारण्यासाठी उरूस मैदान परिसरालगत आलेल्या गायरान येथे गेला होता. त्या वेळी त्याला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्याने टेकडीच्या दिशेने धाव घेतली. तेथे बाळ मोठ्याने रडत होते.

तान्हुले घेऊन जावे : बाळ ज्यांचे असेल त्यांनी घेऊन जावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक पुरभे यांनी केले आहे.