आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरातील सहा रस्ते आदर्श होणार, ७७७ कोटींच्या 'बजेट'मध्ये मनपाचा संकल्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मालमत्ता कराचे उद्दिष्ट १०५ कोटींवरून २३० कोटींवर नेत त्यात एलबीटीपोटी २३५ कोटी जमा होतील अशा गृहितकांवर महापालिका प्रशासनाने ७७७ कोटींचा २०१६-१७चा अर्थसंकल्प आज स्थायी समितीसमोर सादर केला. या अर्थसंकल्पात सहा प्रभागांतील सहा रस्ते आदर्श करण्याचा संकल्प करण्यात आला असून एकूणच रस्त्यांशी संबंधित कामांसाठी १९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

प्रशासनाने तयार केलेला अर्थसंकल्प आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी स्थायी समितीच्या बैठकीत सभापती दिलीप थोरात यांच्याकडे सादर केला. त्यात नैसर्गिक वाढीचे तत्त्व सांभाळत एकत्रित उत्पन्नात २० टक्के वाढ गृहीत धरून ७७७ कोटी ७४ लाखांचा २१ लाख ५२ हजार रुपये शिलकीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यावर येत्या १९ तारखेला स्थायी समिती चर्चा करून त्यात बदल सुचवणार आहे. सरत्या आर्थिक वर्षाचा प्रशासनाचा अर्थसंकल्प ५६९ कोटींचा होता, तो फुगवून पार ९७५ कोटींपर्यंत टेकवण्यात आला होता, पण प्रत्यक्षात तो ५९५ कोटींपर्यंतच जाऊ शकला.

आगामी अर्थसंकल्पात शहराची सर्वात मोठी समस्या असणाऱ्या रस्त्यांवर भर देण्यात आला असून त्यासंबंधित कामासाठी १९ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. शहरातील सहा प्रभागांतील प्रत्येकी एक असे एकूण सहा रस्ते आदर्श रस्ते म्हणून तयार करण्यात येणार आहेत. फुटपाथ, दुभाजक, कॅट आइज, दिशादर्शक फलक झेब्रा क्राॅसिंग आदी सुविधा असणारे हे रस्ते असणार आहेत. यासाठी कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय शहर विकास योजनेतून रस्त्यांच्या कामांसाठी कोटी रुपये, रस्त्यांवरील विजेच्या खांबांच्या नूतनीकरणासाठी कोटी, रस्त्यांवर दुभाजक टाकणे, फुटपाथ तयार करणे इतर कामांसाठी कोटी रुपये अशी तरतूद करण्यात आली आहे.

शिक्षण विभागासाठी कोटी ८५ लाख : महापालिकेच्या शिक्षण विभागासाठी एकूण कोटी ८५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यात क्रीडा साहित्यासाठी सर्वाधिक ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी दहावीत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यासाठी फक्त पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय ई-लर्निंगअंतर्गत एलसीडी स्क्रीन संबंधित प्रशिक्षण साॅफ्टवेअर खरेदी करण्यात येणार आहे. लक्षणीय म्हणजे महापालिकेची सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. डिजिटल क्लासरूमसाठी फक्त लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ऐतिहासिक वास्तू संवर्धनासाठी ५.१० कोटी : शहरातील दरवाजांचे संवर्धन सुशोभीकरण, एेतिहासिक वास्तूंकडे जाणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण सौंदर्यीकरण, ऐतिहासिक वास्तूंपैकी जागेची उपलब्धता विचारात घेऊन तेथे लाइट साऊंड शो सुरू करणे, तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांची भाषेची अडचण सोडवण्यासाठी दुभाषकांना खास करून जपानी, चिनी, थाई जर्मन या भाषांचे प्रशिक्षण देणे यासाठी कोटी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

टार्गेट वाढवले, पण धोरण नाही : मालमत्ताकराचे उद्दिष्ट २३० कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे. सरत्या आर्थिक वर्षात आधी देण्यात आलेले १५६ कोटींचे टार्गेट १०५ कोटींचे करण्यात आले, पण आता १०० कोटीही वसूल होतील की नाही याची खात्री नाही. असे असताना थेट २३० कोटींचे टार्गेट देताना ते येणार कसे यावर काहीही ठोस स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. येत्या आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यापासूनच मागणीपत्र वाटप करून वसुली सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, अर्थसंकल्पासंदर्भात गुरुवारी दुपारी वाजता भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी भाजप नगरसेवकंाची बैठक बोलावली आहे.
महिलांसाठी कोटी ७० लाख
मनपा शाळांतील मुलींना सॅनिटरी नॅपकिन पुरवणे, महिला बालकांसाठी वाचनालय सुरू करणे, महिलांसाठी सांस्कृतिक सभागृह बांधणे, मनपा वाॅर्ड कार्यालयांतर्गत महाविद्यालये, बसस्थानक, रेल्वेस्टेशन, विमानतळ येथे महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन्स बसवणे नोकरदार महिलांसाठी वसतिगृहे उभारणे यासाठी कोटी, तर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यासाठी ७० लाख अशी एकूण ५.७० कोटींची तरतूद केली आहे.

अपंगांसाठी कोटींची तरतूद
अपंगांना शिष्यवृत्ती, बस स्टाॅप मनपाच्या शाळांत अपंगांसाठी साेयी-सुविधा, सार्वजनिक शौचालयात स्वतंत्र व्यवस्था आदी कामांसाठी सुमारे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

6 वाॅर्डांत सहा कचरा प्रक्रिया प्रकल्प
शहरातदररोज ४०० टन कचरा उचलला जातो. त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी नारेगावात जाणारा कचरा थांबवण्यासाठी वाॅर्डांत सहा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
इतर महत्त्वाच्या तरतुदी
>५० कोटी रु. स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होण्यासाठी आर्थिक तरतूद
>०१ कोटी १० लाख रु. शहरातून वाहणाऱ्या नाल्यांचा पूर नियंत्रण विकास आराखडा तयार करून संबंधित कामांसाठी
>१० लाख रु. साहसी खेळांसाठी साहित्य खरेदी त्यासाठी मैदानांची व्यवस्था
>२५ लाख रु. सायन्स पार्कच्या निर्मितीसाठी
>०१ कोटी रु. शहरात बारा ठिकाणी नवीन वाहतूक सिग्नल बसवण्यासठी
>०१ कोटी रु. ई-गव्हर्नन्ससाठी
>५० लाख रु. मनपाच्या प्रत्येक आरोग्य केंद्रात पॅथाॅलाॅजी लॅबसाठी
कोटी रु. गरवारे स्टेडियमसाठी
>१० लाख रु. बहुमजली वाहनतळ उभारण्यासाठी
>१५ लाख रु. सोलर सिटी प्रकल्पासाठी
>१५ लाख रु. सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावण्यासाठी
छायाचित्र: स्थायी समिती सभापती दिलीप थोरात यांच्याकडे मनपाचा अर्थसंकल्प सादर करताना आयुक्त ओमप्रकाश बकोरिया.
बातम्या आणखी आहेत...