आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाकृतीतूनच मिळते जगण्याची उमेद, विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा गौरव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कलावंतांना जगण्याची नवी उमेद कलाकृतीतूनच मिळते, त्यांना ऊर्जा मिळते, असे प्रतिपादन अॅड. डी. एस. कोरे यांनी यशवंत कला महाविद्यालयात केले. 

महाविद्यालयात सातव्या वार्षिक कला प्रदर्शनाच्या उद््घाटनप्रसंगी अॅड. डी. एस. कोरे बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. पी. डी. जगताप होते. प्रा. व्ही. जे. जोशी, डॉ. विजय देशमुख, डॉ. गणेश कुलकर्णी, प्राचार्य रवींद्र तोरवणे यांची उपस्थिती होती. 

अॅड. कोरे म्हणाले की, नवीन दृष्टी बनविण्याची ताकद कलावंतामध्ये असते. कलावंताच्या कुंचल्यातून होणारी निर्मिती ही हजारो वर्षे टिकते. कलावंतांना जगण्याची नवी उमेदही कलाकृतीतूनच मिळते. कलावंताची बौद्धिक पातळी उच्च दर्जाची असते. त्यामुळे कलावंतांना समाजात प्रथम दर्जाचे स्थान आहे. डॉ. जगताप म्हणाले की, उत्तम कलावंत घडवण्यासाठी कला क्षेत्रात रियाजाशिवाय पर्याय नाही. जीवनात पुढे जायचे असेल तर निरीक्षण शक्ती वाढवा, सराव वाढवा. ब्लॅक क्वीन नावाच्या चित्रात स्त्री सौंदर्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे चित्र आहे. 

अज्ञात कलावंतांनी सरावातून अजिंठा कलाकृती अजरामर केल्या. तसे भविष्यात आपण मोठे कलावंत होऊन देशाचे नाव करावे. अमूल्या देशमुख हिने आकर्षक चित्र कलाकृती काढून लक्ष वेधले. वर्षभरात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन यात मांडण्यात आले होते. फाउंडेशनपासून ते प्रथम-द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी लक्षवेधक कलाकृतींची निर्मिती केली. ज्यामध्ये विविध व्यक्तिचित्ररेखा, मातीपासून विविध पक्षी, चेहरे, अवॉर्डची कलाकृती मांडण्यात आली आहे. यासोबत पेंटिंगमध्ये निसर्गचित्र, स्मरणातील चित्र, वस्तुचित्र, द्विमितीय, त्रिमितीय चित्र कलाकृती मांडण्यात आली आहे. प्रा. पंढरीनाथ खैरनार, प्रा. सरिता उंबरकर, प्रा. अभय तांबटकर, प्रा. वैशाली कुलकर्णी यांनी पुढाकार घेतले. श्रद्धा जगताप यांनी सू़त्रसंचालन केले. वैशाली कुलकर्णी यांनी आभार मानले. 

विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण 
विद्यार्थ्यांनीरेखाटलेल्या कलाकृतींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यात फाउंडेशनमध्ये साईनाथ आडे-प्रथम (मेमरी ड्राॅइंग), आकाश जमादार-द्वितीय (ऑब्जेक्ट पेंटिंग),ऊर्मिला कुचेकर- तृतीय (नेचर पेंटिंग) क्रमांक आला. एटीडी प्रथम वर्षामध्ये जीवन राऊत याला ऑब्जेक्ट पेंटिंग्जमध्ये प्रथम पारितोषिक, रोशनी खंडेवाल द्वितीय, ज्योती नांदेडकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. एटीडी द्वितीय वर्षातून प्रथमेश मुधळवाडकर-प्रथम, बाळू राठोड-द्वितीय, पूजा जंवजाळ-तृतीय क्रमांक आला. रेखा रंगकला विभागात प्रथम वर्षातून महेश पाटील-प्रथम, अनिकेत बनकरचा द्वितीय क्रमांक आला. 

याबरोबरच द्वितीय वर्षातून शाहरुख पिंजारी-प्रथम, प्रतीक्षा व्यवहारे- द्वितीय, सुभाष वळवी-तृतीय क्रमांक पटकावला. तृतीय वर्षातून पिसा तडवी-प्रथम, रूपाली पदार-द्वितीय, शीतल घोडके हिने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच डिप्लोमा पेंटिंग्जमधून सृष्टी पटेल-प्रथम, द्वितीय- दीपिका पवार, शिवानी डोळस-तृतीय क्रमांक पटकावला. गुणवत्तेमध्ये कल्याणी जाणतीकर यांना गौरवण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...