आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिके काढणी आटोपली; नुकसानीचे पुन्हा पंचनामे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उंडणगाव - गारपिटीने झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने एकदा पंचनामे केले. केंद्रीय पथकानेही आढावा घेतला. त्यानंतर हाती लागेल तेवढय़ा पिकांची शेतकर्‍यांनी काढणीही केली, परंतु प्रशासनाने आता पुन्हा पंचनाम्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. आधीच्या पंचनाम्यातून दमडीही मिळाली नसल्याने शेतकर्‍यांत संताप आहे. पंचनाम्याचा फार्स केला जात असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. दरम्यान, हे नव्याने पंचनामे नसून, महसूल यंत्रणेकडे रेकॉर्ड राहावे म्हणून स्पॉट पंचनामे केले जात असल्याचे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी सांगितले.