आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Small Scale Irrigation Bow Taluka Of Aurangabad District 27 Project

लघुसिंचनात औरंगाबाद जिल्ह्याला झुकते माप तालुक्यात 27 प्रकल्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राज्यातील 272 लघुसिंचन प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा नुकताच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. यातील 78 प्रकल्प एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात असून या प्रकल्पांमुळे जवळपास अडीच हजार हेक्टर सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे. लघुसिंचनाच्या निर्मितीमुळे फायदा होणार असला, तरी दीर्घकालीन फायद्यासाठी त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे असल्याचे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

272 प्रकल्पांच्या माध्यमातून राज्यात 10366 हेक्टर सिंचन होणार आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती या विभागांत हे लघुसिंचन प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचा मोठा फायदा होणार आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक प्रकल्प :

272 लघुसिंचन प्रकल्पांपैकी 78 प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. तर मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यांत 84 प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पांची 0 ते 100 हेक्टर आणि 101 ते 250 हेक्टर अशी वर्गवारी करण्यात आली आहे. 0 ते 100 हेक्टर प्रकारात औरंगाबाद जिल्ह्यात 77 प्रकल्प आहेत. तर 101 ते 250 हेक्टरमध्ये औरंगाबाद, जालना आणि उस्मानाबादमध्ये प्रत्येकी 1 आणि लातूरमध्ये 2 प्रकल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. तालुकानिहाय विचार केल्यास औरंगाबाद तालुक्यात 27, गंगापूरमध्ये 15, वैजापूर 11, खुलताबाद 8, सोयगाव 5, फुलंब्री 6 आणि सिल्लोडमध्ये 2 प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या सर्व प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्ह्यात अडीच हजार हेक्टर सिंचन होणार आहे.