आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचतीतून विद्यार्थ्यांनी जमवला 7 हजार पुस्तकांचा खजिना, वेरूळच्या समंतभद्र गुरुकुलमधील उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेरुळच्या समंतभद्र गुरुकुल मध्ये मागील 15 वर्षांपासून हा उपक्रम चालत आहे. - Divya Marathi
वेरुळच्या समंतभद्र गुरुकुल मध्ये मागील 15 वर्षांपासून हा उपक्रम चालत आहे.
वेरूळ - खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील समंतभद्र गुरुकुलमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून मुलांनी वाढदिवशी पालकांनी खाऊसाठी दिलेले पैसे जमा करत शाळेत आजमितीस सात हजारांवर पुस्तकांचा खजिना जमा केला आहे. यात शाळेला भेट देणाऱ्या पाहुण्यांकडून दिलेल्या बक्षिसाच्या रकमेची बचत करून या पुस्तकांच्या योजनेला हातभार लावला जात आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या वाढदिवसाची कायमस्वरूपी आठवण जपण्यासाठी पुस्तकांचा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरत आहे.
 
वाढदिवसाची कायमस्वरूपी आठवण म्हणून आपण जमा केलेल्या खाऊच्या पैशातून दहा रुपयांपासून शक्य तेवढी रक्कम ग्रंथपालांकडे जमा करतात आणि या शाळेचे ग्रंथपालही तेवढ्याच रकमेची पुस्तके आणून त्या पुस्तकावर पैसे देणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव टाकून इतर विद्यार्थ्यांना तीच पुस्तके मोफत वाचनास देतात.
 
साधारण गेल्या पंधरा वर्षांपासून चालू असलेल्या विनाबंधन या उपक्रमातून आजघडीला या शाळेकडे सुमारे सात हजार पुस्तके जमा झाली असून या पुस्तकांचा लाभ शिक्षक, आजी-माजी विद्यार्थ्यांसह अनेक जण मोफत घेत आहेत. या शाळेची स्थापना १९६२ मध्ये झाली. आजघडीला शिक्षण, क्रीडासह विविध उपक्रमांमुळे खुलताबाद तालुक्यातील नावलौकिकप्राप्त ही शाळा असून प्रशालेत एकूण १२७५ विद्यार्थी इयत्ता 5वी ते १० वीपर्यंत शिक्षण घेत अाहेत.
 
व्याजाच्या पैशातून दरवर्षी खरेदी
आवडत्याव्यक्तीचा वाढदिवस पुण्यस्मरणानिमित्ताने प्रशालेला दरवर्षी एक ग्रंथ ग्रंथालयाला भेट स्वरूपात देता यावा या हेतूने ११०० रुपये ठेव स्वरूपात ठेवून त्यातून दरवर्षी येणाऱ्या व्याजाच्या एकशे दहा रुपयांतून ग्रंथ विकत आणण्यात येतो. प्रशालेच्या पतसंस्थेत येणाऱ्या पाहुण्यांना प्रेरणा देऊन रु. २५ हजार ठेव रूपाने आजतागायत जमा असून ह्यातून दरवर्षी ग्रंथ खरेदी केले जातात. दोनच दिवसांपूर्वी पार पडलेल्या मु्ख्याध्यापकांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनीही ग्रंथालयास आपल्या पद्धतीने सालाबादप्रमाणे अनेक ग्रंथ भेट दिले आहेत.
 
विद्यार्थ्या मध्ये वाचनाची आवड निर्माण होणे ही काळाची गरज आहे व वाचनाची आवड हि ग्रंथालयाच्या माध्यमातूनच पूर्ण होऊ शकते शासनाकडून अनुदान मिळत नाही मग काय करता येऊ शकते म्हणून अनेक पर्याय शोधले गेले ह्यात प्रशाळेचे माजी विद्यार्थ्याना प्रेरणा देऊन तसेच येणाऱ्या पाहुणे मंडळींना विद्यार्थ्याच्या दृष्टीने वाचन हि काळाची गरज आहे ग्रंथ साठा वाढला पाहिजे या दृष्टीने ग्रंथ भेट योजना तयार करण्यात आली यात गावातील अनेक मान्यवरांनी आपला सहभाग नोंदविला आहे आणि विद्यार्थीही विनाबंधन चांगली साथ देत आहेत.
-  गुलाबचंद बोराळकर, मुख्याध्यापक.  

प्रशाळेतील ग्रंथालयात ग्रंथ वाढ व्हावी या दृष्टीने विद्यार्थी व शिक्षक वाढदिवस संकल्पना अस्तित्वात आली व रु 10 पासून तर शिक्षक वाढदिवसाला रु 500 ते 1000 पर्यंतची राशी प्राप्त होत गेली व ग्रंथालयात पुस्तके वाढत गेली सोबतच शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलाकडून प्रशाळेचे आठवण म्हणून "स्वच्छेने एक ग्रंथ ग्रंथालयाला "योजना आणून ग्रंथालय समृद्ध करण्यात येते.
- अतुल बांधे, ग्रंथपाल.
 
बातम्या आणखी आहेत...