आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Smart City Evolution, Aurangabad Municipal Corporation Get 77.5 Marks

स्मार्ट सिटी मूल्यांकन, औरंगाबाद महानगरपालिकेला ७७.५ गुण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद महानगरपालिकेने मंगळवारी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार सुकाणू समितीसमोर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या दाव्याबाबत सादरीकरण केले. स्वयंमूल्यांकनात मनपाने १२ पैकी ११ निकषांत मिळून ७७.५ गुण मिळाल्याचे सादर केले. यातील काही निकष अद्याप पूर्ण होणे बाकी असल्याने सुकाणू समितीनंतर होणा-या तपासणीत मनपाचे गुण कमी होण्याची भीती आहे.

स्मार्ट सिटी व अमृत या दोन्ही योजनांत औरंगाबादचा समावेश व्हावा यासाठी मनपाने आपले दावे सादर केले आहेत. त्यापैकी स्मार्ट सिटीसाठी मुंबईत मनपा आयुक्त प्रकाश महाजन व शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी उच्चाधिकार समितीसमोर सादरीकरण केले.
या सादरीकरणाआधी मनपाने १२ निकषांवर आपले स्वयंमूल्यांकन करणे आवश्यक होते. त्यापैकी ११ बाबींवर मनपाने स्वत:ला गुणांकन दिले आहे, तर एक निकष पूर्ण झालेला नसल्याने त्यात शून्य मिळाले आहे.

या निकषांपैकी आॅनलाइन तक्रार निवारण यंत्रणा सुरू करण्याची तयारी दाखवत मनपाने होकार दर्शवत ५ गुण मिळवले असले तरी प्रत्यक्षात त्या दिशेने काहीच हालचाली केलेल्या नाहीत. शिवाय नागरिकांना मनपाच्या कामाची माहिती पुरवण्यासाठी किमान एक ई-वार्तापत्र प्रकाशित करणे या निकषातही मनपाने होकार देत ५ गुण घेतले आहेत. प्रत्यक्षात मनपाच्या वेबसाइटवर असे काही वार्तापत्र नाही की एखादे प्रकाशितही झालेले नाही.

स्मार्ट सिटीसाठी आलेल्या अर्जांतून महापालिकांची निवड करण्यासाठी राज्य सरकारचे एक पथक येणार असून ते आपल्या स्तरावर विविध निकषांची पडताळणी करून गुणांकन करणार आहेत. त्यांच्या तपासणीतच मनपाने केलेले दावे किती सत्य किती फोल ते समोर येईल.

पुढे वाचा, असा आहे मनपाचा मार्कमेमो