आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Smart City Municipal Budget Increased By 110 Crore

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मार्ट सिटीसाठी मनपाचे बजेट तब्बल ११० कोटींनी फुगवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स्मार्टसिटीच्या शर्यतीत उतरलेल्या मनपाला किमान दाखवण्यासाठी तरी आपले बजेट मोठे करावे लागले की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. उत्पन्नवाढीचे ठोस उपाय सुचवताच टार्गेट वाढवण्यात आले ७८३ कोटींचे बजेट ८९३ कोटींवर नेत ते स्थायी समितीने आज मंजूर केले. विशेष म्हणजे अर्थसंकल्पावर चर्चा, ऊहापोह असे काहीच होता अवघ्या २७ मिनिटांत बजेटची बैठक गुंडाळण्यात आली.
आॅगस्ट रोजी मनपा प्रशासनाने १७० कोटींची स्पिल ओव्हरची कामे करवसुलीच्या उद्दिष्टांत वाढ करीत ७८३ कोटी ८६ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. यावर स्थायी समितीत सांगोपांग चर्चा होऊन मगच तो मंजूर करून सर्वसाधारण सभेकडे पाठवणे अपेक्षित होते. दरम्यानच्या काळात बराच कालावधी उलटल्यावरही स्थायी समितीची अर्थसंकल्पाबाबत बैठक झालीच नाही. गुरुवारी ही बैठक होणार असे जाहीर करण्यात आले होते. या बैठकीत सदस्य स्पिल ओव्हरच्या अनावश्यक कामांना कात्री लावत उत्पन्न वाढीसाठी ठोस उपाय सुचवत उद्दिष्ट वाढवून वाढीव अर्थसंकल्प मंजूर करतील अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही.

दुपारी पावणेबारा वाजता सुरू झालेली बैठक अवघ्या २७ मिनिटांत उरकण्यात आली. प्रशासनाने फुगवलेल्या बजेटबाबत ना कुणी विचारले ना उत्पन्न वाढीबाबत चर्चा झाली. उर्वरितपान
चार-पाचसदस्य औपचारिकपणे बोलले आणि बैठक संपली. अवघ्या २७ मिनिटांत बजेट मंजूर करणारी इतिहासातील ही पहिली स्थायी समिती असावी.

हे असे का झाले याबाबत अधिक माहिती खोदली असता सूत्रांनी सांगितले की, स्मार्ट सिटीच्या यादीत औरंगाबाद मनपाचे नाव शर्यतीत ठेवायचे असेल तर ज्या अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्यात मनपाची आर्थिक बाबही विचारात घेतली जाणार आहे. त्यामुळे मनपाचा अर्थसंकल्प बऱ्यापैकी मोठा दिसला पाहिजे. त्या हेतूनेच अर्थसंकल्प प्रशासनानेच वाढवला असावा, अशी काही माजी नगरसेवकांची माहिती आहे. अर्थसंकल्प ७७३ कोटींचा केला की मग स्थायी सर्वसाधारण सभा मिळून त्यात आणखी भर टाकून १००० कोटींच्या उंबरठ्यावर तो आणला की मनपाचे बजेट किती मोठे आहे हे दाखवता येते, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

शॉपिंग कॉम्‍प्‍लेक्‍स उभारणार
या वेळी सभापती दिलीप थोरात यांनी एक पानाची बजेट वाढ सांगणारी एक टिप्पणी वाचून दाखवली. त्यात त्यांनी म्हटले की, सर्व मालमत्तांना कंप्लिशन सर्टिफिकेट घेण्यास बाध्य करणे मनपाच्या शहरातील मोक्याच्या जागांवर टीव्ही सेंटर शॉपिंग कॉम्‍प्‍लेक्‍ससारखे प्रकल्प हाती घ्यायला हवेत. त्यातून अतिरिक्त उत्पन्न उभे होईल.

स्पिलच्या कामांचा आढावा : स्पिलओव्हरची कामे रद्द करण्याबाबत थोरात म्हणाले की, दोन ते तीन वर्षांपासून स्पिलच्या यादीत असूनही कामे होऊ शकत नाहीत. अनावश्यक कामांची वाॅर्डनिहाय यादी पुढील बैठकीत मांडावी.

काय झाली चर्चा ?
गजानन बारवाल : वाॅर्डांतनगरसेवकांची कामे व्हावीत. हे करतानाच उत्पन्न वाढीकडे प्रशासनाने अधिक गांभीर्याने बघावे.

अज्जूनाईकवाडी : गुंठेवारीतबांधकामे नियमित केली तर किमान ४० कोटी रुपये मिळतील. नंतर बांधकाम परवानगीच्या माध्यमातून उत्पन्न वाढेल. अहो, माझ्या घराला आजही १४० रुपयेच टॅक्स येतो. ९० नंतर मालमत्ता कराची फेरआकारणी झालेलीच नाही. ती करा. गजाननमनगटे : शहरातबाळासाहेब ठाकरे यांच्या नावे सुरू केलेली मोफत अंत्यविधी योजना पुन्हा सुरू करा. त्यासाठी फक्त अडीच कोटी रुपये लागतात. त्याची तरतूद करा.

विलासएडके : हेबजेट म्हणजे स्वप्नासारखा प्रकार आहे. प्रत्यक्षात कामे होणार नाहीत. यापेक्षा वाॅर्डांना कोटी रुपयांचा निधी दिला तर काही कामे तरी मार्गी लागतील. प्रशासनाने कठोर होऊन काम केले तर अनेक कामे शक्य आहेत.

मनपाच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी स्थायी समितीची बैठक घेण्यात आली होती.
{प्रशासनाने दाखवलेलेउत्पन्न : ~७८३कोटी ८६ लाख { स्थायीनेकेलेली वाढ:~ ११०कोटी {नवीन जमा: ~८९३कोटी८६ लाख {नवीन खर्च: ~८८९३कोटी७६ लाख {शिल्लक: ~१०लाख
इतर किरकोळ १६ कोटी वाढ