आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीसाठी मनपाकडून माहिती संकलनाला प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अमृत आणि स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबादचा समावेश करावा, त्या साठीच्या अटी पूर्ण करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे पत्र महापालिकेने राज्य सरकारला पाठवले असून राज्य सरकारने मागवलेली माहिती संकलित करण्याचे काम सध्या सुरू आहे.
२५ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी अमृत या शहरी विकासाच्या दोन महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केल्या. या दोन्ही योजना शहराला मिळू शकतात; पण त्यासाठी पात्र होण्यासाठी घालण्यात आलेल्या कठोर अटींचे आव्हान मनपापुढे आहे. या दोन योजनांतून येणारा मोठा निधी पाहता या अटींचे पालन करण्याची तयारी मनपाला दाखवावी लागणार आहे. मनपा प्रशासन लोकप्रतिनिधींनीही त्या दिशेने पावले उचलण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे मनपाने या योजनेत सहभागी होण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

मनपा आयुक्त प्रकाश महाजन म्हणाले, स्मार्ट सिटीत औरंगाबादचा समावेश करावा, अशी मागणी करणारे पत्र आम्ही राज्य सरकारला पाठवले आहे. राज्य सरकारने त्यासंदर्भात विशिष्ट फाॅर्मेटमध्ये माहिती मागवली असून ती तयार करण्याचे काम सुरू आहे.

मनपा सभेपुढे ठराव मांडणार
शहरातीलमालमत्तांची संख्या, वसुली, पाणीपुरवठ्याबाबतचा तपशील, नागरी सुविधांबाबतची सद्य:स्थिती, उत्पन्नाचे स्रोत याबाबतचा हा तपशील असणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
एकीकडे प्रशासन स्मार्ट अमृतच्या तयारीला लागले असताना येत्या सोमवारी होणा-या सर्वसाधारण सभेत स्मार्ट सिटी अमृत योजनेत शहराचा समावेश करण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करणे, आवश्यक सुधारणांसंबंधी मनपाला मार्गदर्शन करणे तसेच इतर तांत्रिक बाबींची पूर्तता करणे यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासाठी परवानगी मागणारा ठराव मांडण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...