आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीचा आराखडा वीस डिसेंबरपर्यंत सादर होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्मार्ट औरंगाबादमध्ये काय असावे, याबाबत मोठ्यांच्या मतांसोबतच चिमुरड्यांकडूनही मते मागवण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटी कशी असावी, याबाबत शालेय मुलांच्या निबंध, चित्रकला स्पर्धांतून नवीन कल्पना सूचना जाणून घेतल्या जाणार आहेत. याशिवाय तरुणांना आपल्या शहरात काय असायला हवे हे जाणून घेण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी नेमलेल्या नाइट फ्रँक-फोर्ट्रेस कंपनीने कामाला प्रारंभ केला असून २० डिसेंबरपर्यंत केंद्राला आराखडा सादर करावयाचा आहे.

केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद मनपाने दावा केला असून ९८ शहरांच्या यादीत औरंगाबादचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी २० शहरांची निवड डिसेंबर महिन्यात जाहीर केली जाणार असून त्यात औरंगाबादचा समावेश व्हावा यासाठी हालचालींना प्रारंभ झाला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात नेमके काय करायचे आहे याचा आराखडा करण्यासाठी नाइट फ्रँक-फोर्ट्रेस कंपनीला प्रकल्प सल्लागार नेमण्यात आले आहे. या कंपनीला दोन महिन्यांत हा आराखडा तयार करायचा असून त्यांच्या नेमणुकीचा प्रस्ताव आजच्या स्थायी समितीसमोर मांडण्यात आला. त्या आधी सगळ्या सदस्यांनी पीएमसी नेमके काय करणार याची माहिती आम्हाला द्या, अशी मागणी केल्याने आज नाइट फ्रँक-फोर्ट्रेसच्या प्रतिनिधींना बोलावून स्थायी समितीत याबाबत सादरीकरण करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार आज फोर्ट्रेसचे अजय भोरे यांनी सादरीकरण केले. भोरे यांनी पीएमसी नेमके काय करणार याची माहिती सांगितली.
तीनआठवडे झाले : मागच्यामहिन्यात नाइट फ्रँक-फोर्ट्रेसला पीएमसी म्हणून नेमण्यात आले. नेमणुकीच्या तारखेपासून दोन महिन्यांचा कालावधी आराखडा तयार करण्यासाठी देण्यात आला आहे. कंपनीने १४ आठवड्यांचा कालबद्ध कार्यक्रम तयार केला असून त्यातील तीन आठवडे पूर्ण झाले आहेत. पहिला टप्प्यात पीएमसीने आराखड्यासाठी लागणारी मूलभूत माहिती गोळा करायला प्रारंभ केला असून जवळपास ६० टक्के माहिती गोळा झाली आहे.
नागरिकांच्यासहभागाला महत्त्व : याशहरात राहणाऱ्या नागरिकांना नेमके काय हवे आहे ते जाणून आराखड्यात त्यांचा समावेश करणे बाध्य असल्याने पीएमसीला त्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहे. त्यासाठी सीआयआय, आर्किटेक्चर संघटना, अभियंता संघटना अशा संघटनांसह सामान्य नागरिकांना सहभागी करून घेतले जाणार आहे.

सहा झोनमध्ये सहा बैठका : शहराच्यासहा झोन कार्यालयांतर्गत येणाऱ्या भागांतील नागरिकांसाठी सहा बैठका घेतल्या जातील. तेथे येणाऱ्या तोंडी लेखी सूचनांचा विचार केला जाणार आहे. या सूचना प्राथमिक अहवालात नंतर सारा तपशील पाहून अंतिम आराखड्यात समाविष्ट केल्या जाणार आहेत.

चिमुरड्यांनो,तयार राहा : स्मार्टसिटी ही भविष्यातील गरजांचा विचार करून तयार करण्यात येणार असल्याने भावी पिढीला त्यांचे शहर कसे असावे, याबाबत मते मांडता येणार आहेत. यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध चित्रकला स्पर्धांच्या माध्यमातून त्यांच्या कल्पना जाणून घेतल्या जातील. एवढेच नव्हे, तर महाविद्यालयीन तरुणाईलाही आपल्या शहराचे रूप ठरवण्यासाठी सहभागी करून घेतले जाणार आहे.

सदस्यांचे वेगळेच तुणतुणे : आराखडाकसा तयार करणार, त्यात काय असेल याची प्रारंभिक माहिती देण्यासाठी करण्यात आलेल्या या सादरीकरणानंतर स्थायी समिती सदस्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारावेत, अशा थाटात नाइट फ्रँक-फोर्ट्रेसच्या प्रतिनिधींना सवाल केले. समांतर, भूमिगतचे काय करणार येथपासून कचरा, साफसफाई, पार्किंग, अतिक्रमणे, गुंठेवारी, झोपडपट्ट्या या विषयांवर सवाल केले. त्यावर अधिकाऱ्यांनी आम्ही फक्त अहवाल करणार आहोत, त्यात काय समाविष्ट करायचे हे तुमच्या सगळ्यांशी चर्चा करूनच ठरवू, असे सांगितले. या सादरीकरणानंतर विषयपत्रिकेवरील नाइट फ्रँक-फोर्ट्रेसला काम देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

असे आहेत टप्पे
>कामाला प्रारंभ, त्यात आराखडा तयार करण्याबाबत शहराची आवश्यक असलेली माहिती गोळा करणे. यापैकी बहुतांश माहिती मनपाच देणार असून काही भाग इतर सरकारी विभागांच्या माध्यमातून मिळवण्यात येणार.
>शहराचा आराखडा तयार करण्याआधी नागरिकांशी चर्चा करण्यात येणार असून शहराच्या लोकसंख्येच्या किमान १० टक्के लोकांना यात सहभागी करून घेतले जाणार.
>नागरिकांशी संवाद साधल्यानंतर आलेल्या सूचनांचा समावेश करून कच्चा आराखडा तयार करणार
>यानंतर आराखडा करताना त्यातील कामांचे स्वरूप पाहून आर्थिक नियोजन करण्यात येणार आहे.
> नागरिकांच्या सूचनांसह विविध अभ्यासांतून समोर येणारे निष्कर्ष मतप्रवाहांचा विचार करून स्मार्ट सिटीचा अहवाल तयार करणार

टप्प्यांत होईल काम
नाइटफ्रँक-फोर्ट्रेसने १४ आठवड्यांचे पाच टप्पे तयार केले असून त्यात हे सारे काम होणार आहे. २० डिसेंबरपर्यंत केंद्र सरकारला आराखडा सादर करायचा असून त्याआधीच हे काम पूर्ण करण्याची तयारी कंपनीने केली आहे. त्यासाठी जवळपास २० जणांची टीम कंपनीने या कामाला लावली असून त्यात शहर विकासाशी संबंधित विविध शाखांचे तज्ज्ञ त्यात आहेत.