आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीसाठी महिन्यात ठरणार पहिले काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्मार्टसिटीच्या नियोजनासाठी गठित करण्यात आलेल्या एसपीव्ही कंपनीच्या (स्पेशल पर्पज व्हेईकल अर्थात विशेष उद्देश वहन) पहिल्या बैठकीला स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अपूर्व चंद्रा मंगळवारी औरंगाबादेत उपस्थित राहिले. या प्रकल्पाचे नियोजन करण्यासाठी ‘सीएच-टू-एमएल’ या प्रकल्प सल्लागार समितीची (पीएमसी) नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. स्मार्ट सिटीसाठी नेमके काय केले पाहिजे, याचा सर्व्हे करून ही कंपनी चार आठवड्यांत अापला अहवाल देईल. त्यानंतर एसपीव्हीचे कर्तेधर्ते आधी प्राधान्य कशाला द्यायचे यावर २० मेपूर्वी बैठक घेऊन निर्णय घेतील आणि त्यानंतर स्मार्ट सिटीचे काम सुरू होईल.
 
चंद्रा यांनी एसपीव्हीच्या संचालक मंडळाची बैठक घेतली. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोेत्तम भापकर, पालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महापौर भगवान घडामोडे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. तीन महिन्यांपासून स्मार्ट सिटीच्या नियोजनासाठी सल्लागार समितीची नियुक्ती होत नव्हती. प्रशासनाकडून डीएमआयसीच्या कामाचे नियोजन करणाऱ्या सीएच-टू-एमएल या कंपनीला स्मार्ट सिटीचे काम देण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
 
चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार सल्लागार समितीचे शहरात अाठ दिवसांत कार्यालय थाटले जाईल. प्रकल्प व्यवस्थापक तसेच त्यांचे सहायक येथे दाखल होतील. त्यानंतर दोन आठवडे त्यांना शहराचे सर्वेक्षण करण्यासाठी लागेल. स्मार्ट सिटीत कोणती कामे करायचे, त्यासाठी किती खर्च येईल, कालावधी किती लागेल, याचा अहवाल ही समिती तयार करेल. एसपीव्हीच्या पुढील बैठकीत ते पॉवर पाॅईंट प्रेझेंटेशन करतील. शहर बस, घनकचरा व्यवस्थापन, पॅन सिटी, ग्रीन फिल्ड या सर्व बाबींचा त्यात समावेश असेल. एसपीव्हीचे संचालक मंडळ त्यानंतर कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे हे ठरवेल. हाती अहवाल पडल्यानंतर त्यांनी फक्त आदेश द्यायचा आहे. त्यानुसार स्मार्ट सिटीचे प्रत्यक्ष काम तीन महिन्यांंनंतर सुरू होऊ शकेल.
 
काम वेळेत सुरू होईल
बरोबर एका महिन्याने प्रकल्प सल्लागार समितीचा अहवाल आमच्यासमोर असेल. त्यातून नेमका कोणता प्रकल्प आधी करायचे हे आमचे मंडळ ठरवेल. आमच्या खात्यात १३७ कोटी रुपये आहेत. त्यामुळे काम सुरू होण्यास विलंब लागणार नाही. पुढील महिना तसेच ती बैठक शहरासाठी महत्त्वाची आहे.
- अपूर्व चंद्रा, मुख्य व्यवस्थापकीय संचालक, स्मार्ट सिटी.
 
बातम्या आणखी आहेत...