आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृतींनी स्वीकारले निमंत्रण, विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभास येणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मनुष्यबळविकासमंत्री स्मृती इराणी यांनी विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभास येण्याचे निमंत्रण स्वीकारले असल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी दिली.

स्मृती इराणी यांना बोलावण्यासाठी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, डॉ. धनराज माने यांनी ग्रामीण विकास मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत दिल्ली येथे इराणी यांची भेट घेतली. त्यांनी विद्यापीठाचे निमंत्रण देखील स्वीकारले आहे. आठ दिवसांत आपण तारीख कळवू, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे जानेवारीत अथवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पदवी प्रदान सोहळा होईल.