आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी केली कासवाची तस्करी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कासव विक्रीच्या माध्यमातून पैशांचा पाऊस पाडण्याचा बेत होता. त्यासाठी एका बाबाने महापूजेचे आयोजन केले होते. 40 लाख रुपये मोजून सोनेरी पाठीचे कासव हा बाबा खरेदी करणार होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. कासवाला आज न्यायालयात हजर केले असता त्याला जायकवाडीच्या जलाशयात सोडण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने दिले. बुधवारी उस्मानपुरा पोलिसांच्या जाळ्यात कासवाची तस्करी करणारी टोळी सापडली होती.
फरार झालेल्यांपैकी अमोल साळवे या आरोपीचे नाव पुढे आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. बुधवारी अटक केलेल्या शेख नाजीम शेख युनूस (रा. संजयनगर, मुकुंदवाडी), गणेश पवार, नरेश पवार यांना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
वाघाची कातडी प्रकरणी कोठडी
बुधवारी क्रांती चौक पोलिसांच्या हाती लागलेल्या वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या रवींद्र अधानेला न्यायालयाने 9 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. क्रांती चौक पोलिसांनी हा गुन्हा वन खात्याकडे वर्ग केला होता. ही वाघाचीच कातडी असल्याचा खुलासा वन खात्याने केला आहे. याप्रकरणी सहायक वनसंरक्षक ए. डी. भोसले तपास करत आहेत.