आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्ष्यांच्या तस्करी’ने केले अंतर्मुख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-उत्तर प्रदेशात पक्ष्यांची मोठय़ा प्रमाणात तस्करी केली जाते. पक्ष्यांची मांसविक्री, विविध आजारांवर उपचार, अंधर्शद्धेपोटी पक्षी बळी देणे अशा विविध बाबींवर प्रकाश टाकणार्‍या लघुपटाने पक्षीप्रेमींना अंतर्मुख केले. शोभेच्या वस्तूंसाठी पिसांची विक्री तसेच चामडीचा वापर विविध वस्तू निर्मितीसाठी करण्याच्या हेतूने होणार्‍या पक्ष्यांच्या हत्येमुळे विविध पक्ष्यांच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, हे भीषण वास्तव यामध्ये दाखवण्यात आले.

एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाउंडेशनच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ‘बर्ड फेस्ट 2014’चा समारोप शुक्रवारी (24 जानेवारी) गोविंदभाई र्शॉफ कला अकादमीच्या सभागृहात झाला. या वेळी प्रा. डॉ. दिलीप यार्दी, नेचर वॉकचे अनुज खरे, विद्यापीठाचे एम. डी. जहागीरदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

नि:शब्द करणारे वास्तव

उत्तर प्रदेशात परवान्याविना पक्ष्यांची विक्री केली जाते. ‘तिसरी आँख’ या नावाखाली पक्षिमित्रांनी बनवलेल्या लघुपटात उघडकीस आलेले भीषण वास्तव पाहून सभागृहातील सर्वच पक्षीप्रेमी नि:शब्द झाले. दिवसाला 1500 कबुतरांची कत्तल आजारावर औषध म्हणून तसेच खाण्यासाठी केली जाते. याशिवाय इतर विविध पक्ष्यांचा बळी देण्यासाठी उपयोग होतो. याविषयी कॅमेर्‍यात वास्तव टिपल्यानंतरही स्थानिक वन्य अधिकार्‍यांनी जबाबदारी झटकली. या बाबींचा पाठपुरावा करण्यात आला, मात्र यश आले नाही. त्यामुळे आजही किती मोठय़ा प्रमाणात पक्षी मारले जात आहेत, अनेक पक्ष्यांच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून आले. महोत्सवाच्या दुसर्‍या दिवसाची सुरुवात सुखना मध्यम प्रकल्पावर पक्षी निरीक्षणाने झाली. रिटा बॅनर्जी यांनी उत्तर पूर्व भारतातील जंगलांत होणारी ‘वन्यप्राण्यांची तस्करी’ याविषयावरील लघुपट दाखवण्यात आला. कोकणातील पक्षी सह्याद्री मित्रमंडळातर्फे पक्ष्यांची ओळख, त्यांची वैशिष्ट्ये, जीवनशैली अशा विविध गोष्टी स्लाइड शोच्या माध्यमातून दाखवण्यात आले. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी अनेकांनी हातभार लावला म्हणून डॉ. दिलीप यार्दी यांनी आभार व्यक्त केले. हा महोत्सव सातत्यपूर्णरीत्या राबवला जाईल, असे आश्वासनही दिले. किरण काळे यांनी सूत्रसंचालन केले.