आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपेत असतांनाच मायलेकीना झाला सर्पदंश; आई ठरली सुदैवी तर लेकीचे झालेे असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लाेड- झोपेत असताना मायलेकीला साप चावल्याची घटना घडली असून यात लेकीचा मृत्यू झाला आहे. सिल्लोड तालुक्यातील हट्टीफाटा नजीकच्या भगवान वाडीवर शनिवारी (दि. २२) ही घटना घडली. भगवान वाडीवरील सुरेश वाघ यांचे कुटुंबीय शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे घरात झोपलेले असताना सखुबाई सुरेश वाघ दुर्गा सुरेश वाघ (१५) या मायलेकींना सापाने चावा घेतला. या घटनेत मुलगी दुर्गा हिचा जागीच मृत्यू झाला. सखुबाई यांनी उपचाराला प्रतिसाद दिल्याने त्यांच्यावरील संकट टळले. दुर्गा ही उंडणगाव येथील सावित्रीबाई फुले कन्या शाळेत शिकत हाेती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे. 
बातम्या आणखी आहेत...