आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सापाने घेतला तोफेत आश्रय अन् ...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुभेदारी विश्रामगृह परिसरात शनिवारी (7 सप्टेंबर) दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास निघालेल्या सापाने बंदोबस्तावरील पोलिस कर्मचारी आणि राजकीय कार्यकर्त्यांची धांदल उडवली. पोलिसांनी त्याला काठीने हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. तेवढय़ात सापाने बाजूला असलेल्या तोफेत आश्रय घेतला.

सापाला तोफेतून बाहेर काढण्यासाठी उपस्थितांपैकी अनेकांनी भरपूर प्रयत्न केले. परंतु अथक परिश्रम करूनही तो बाहेर आला नाही. त्यामुळे हसरूल येथील सर्पमित्राला पाचारण करण्यात आले. त्याने तोफेत गरम पाणी सोडले. त्यानंतर साप लागलीच बाहेर आला व सर्पमित्राने त्यास पकडताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.