आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Funda For Young Voter By Centre Government

तरुणांच्या मतांसाठी ‘यूपीए’ सरकारची ‘सोशल’ फंडा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भ्रष्टाचाराचे आरोप, वाढती महागाई, मंत्र्यांची बेताल वक्तव्ये यासारख्या असंख्य कारणांनी घरघर लागलेल्या केंद्रातील कॉँग्रेसप्रणीत ‘यूपीए’ सरकारला आगामी निवडणूक म्हणजे धोक्याची घंटा वाटू लागली आहे. या पार्श्वभूमीवर चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी व जनकल्याणाच्या योजनांचा प्रचार करून युवकांना आकर्षित करण्यासाठी सरकारने ‘सोशल नेटवर्किंग’चा आधार घेतला आहे.

गुजरात निवडणुकीत बहुतांश माध्यमांनी विरोधी भूमिका घेऊनही मोदी पुन्हा यशस्वी ठरले. दिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर देशभर संतापाची लाट असताना कोणत्याही नेतृत्वाशिवाय युवाशक्तीने थेट राष्‍ट्रपती भवनापर्यंत धडक मारली. या दोन्ही गोष्टी केवळ ‘सोशल नेटवर्किंग साइट’वरील प्रचारामुळे यशस्वी झाल्या. युवकांमध्ये प्रचंड क्रेझ असलेल्या या मीडियाची महती आता केंद्र सरकारला पटली आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुणाईला आकर्षित करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाची एक टीम तैनात करण्यात आली आहे. ही टीम ट्विटर, फेसबुकसारख्या साइटच्या माध्यमातून युवकांपर्यंत आपली धोरणे पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे.

वेबसाइटवर स्वतंत्र खाते: मागील चार वर्षात यूपीए सरकारने काय काय काम केले याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाने एक कोअर टीम तयार केली आहे. विविध सोशल साइटवर खालील नावाने स्वतंत्र खाते उघडून ही टीम त्याद्वारे प्रचार करणार आहे.
दोन महिन्यांतील ठळक घडामोडी
*यू ट्यूबवर राष्ट्रीय नेत्यांच्या जुन्या चित्रफिती टाकल्या.
*नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, महात्मा गांधी आदींची गाजलेली माहिती अपलोड केली.
* डीडी न्यूज व ऑल इंडिया रेडिओवर दिवसभरातील घटनांसंबंधी 2 मिनिटांत माहिती दिली जाते.
* दोन मिनिटांचे बातमीपत्र दिवसातून चार वेळा दाखवले जाते.
*गोवा येथील 43 वा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल प्रथमच यू ट्यूबवर लाइव्ह.


असे उघडले डोळे !
दिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर दिल्लीत निघालेला भव्य मोर्चाचा प्रचार सोशल साइटवरूनच झाला होता. या माध्यमामुळे युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली व सरकारविरोधी वातावरण तयार झाले होते. कोणत्याही नेतृत्वाशिवाय हे शक्य झाल्याने सरकारला या मीडियाची महती पटली.

काय करणार मंत्रालय
महात्मा गांधी राष्‍ट्रीय रोजगार हमी योजना, अन्न सुरक्षा या सारख्या जनहितकारी योजनांचा सोशल साइटमधून प्रचार करण्याचे सरकारचे नियोजन आहे. तसेच इंटरनेटवरील ट्रेंडस्चा अभ्यास, सरकारवर होणारे आरोप खोडून काढत भूमिका मांडणे, सोशल मीडियावर वर्चस्व निर्माण करणे, क्रायसिस मॅनेजमेंट तयार करणे.

मोदींचा ‘करिष्मा’
14 लाख फॉलोअर फेसबुकवर
17 लाख फॉलोअर ट्विटरवर

गांधीजींचे जीवनचरित्र ऑनलाइन : गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त 30 जानेवारीला त्यांच्या माहितीचा खजिना सोशल मीडियावर उघडणार. गांधीजींच्या जीवनातील ठळक घटनांचे 34 फोटो, चित्रफिती प्रसारित करणार.