आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Media News In Marathi, Aurangabad Lok Sabha Constituncy, Divya Marathi

फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटरच्या माध्यमातून मिनिटा मिनिटाला मतदारांशी केला जातोय संपर्क!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर या माध्यमांकडे तरुणाईसाठी टाइमपासचे साधन म्हणून पाहिले जात होते. मात्र या माध्यमांचे स्वरूप आता बदलले आहे. सोशल नेटवर्किंग साइट्सचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेत या निवडणुकीत प्रत्येक उमेदवारांनी याचा पुरेपूर वापर करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे उमेदवार स्वत: टेक्नोसॅव्ही नसला तरी ही बाजू सांभाळण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली आहे. व्हॉट्सअप, फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासाठी दररोज 50 हजार मतदारांशी संपर्क साधला जात आहे, तर आम आदमी पार्टीचे उमेदवार सुभाष लोमटे यांच्यासाठी दररोज 30 हजार मतदारांशी संपर्क साधला आहे. काँग्रेस याबाबत अधिक आग्रही नसली तरी नितीन पाटील यांचे स्वत:चे फेसबुक पेज आहे. त्यावर रोजच्या प्रचारातील घडामोडी, वर्तमानपत्रातील बातम्या आणि इतर गोष्टी अपडेट असतात.


राजकीय पक्षांच्या आयटी सेल, वॉररूम आणि कमांड ऑफिस अशा वेगवगळ्या नावाने या यंत्रणा कार्यरत आहेत. या माध्यमातून निघणारे फतवे, व्यंगचित्र, काटरून, पोस्टर आणि प्रचाराच्या अपडेटची मतदार आणि राजकीय वतरुळात चवीने चर्चा होते. या माध्यमातून प्रभावीपणे वातावरण निर्मिती होते आणि प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचता येते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या माध्यमातून राजकीय कार्यकर्ते आणि सामान्य मतदारांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठही उपलब्ध झाले आहे.


खैरे यांचे फेसबुक कसे केले जाते अपडेट ते वाचा पुढे....