आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मित्रानेच केला मित्राचा ऑनलाइन ‘प्रेमभंग’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर पर्सनलच अधिक होत असतो. त्यात प्रेम करणार्‍या तरुणांसाठी तर फेसबुक हे जणू त्यांचे हक्काचे व्यासपीठ बनले आहे. त्यातून अनेकदा गंमतीजंमती घडतात. असाच एक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. एका मित्राने आपल्या जिवलग मित्रालाच फसवले. प्रेयसीच्या नावाने तो त्याच्याशी गप्पा मारत होता. पण दुसरा मित्र मात्र मात्र त्याला खरे समजला. त्यातून मनस्ताप झाला तो त्या मुलीला. पोलिसांपर्यंत प्रकरण गेल्यानंतर त्यांनी या ‘मित्राला’ चांगलाच धडा शिकवला.

शहरातील एका प्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारा तुषार जाधव (नाव बदललेले आहे) याला दुसर्‍या महाविद्यालयातील एक तरुणी खूप आवडायची. तो मित्रांमध्येही त्याबद्दल चर्चा करायचा. त्यावरून त्याच्या मित्राने त्याची गंमत करण्यासाठी त्या मुलीच्या नावाने फेसबुकवर फेक अकाउंट उघडले. त्यानंतर तो रोज त्या मुलीच्या नावाने त्याच्याशी गप्पा (ऑनलाइन चॅटिंग) करू लागला. आठवडाभराच्या चॅटिंगमुळे तुषारला त्या मुलीशी आपले जुळत असल्याचा विश्वास निर्माण झाला. त्यामुळे तो तिला भेटण्यासाठी गेला. पण प्रत्यक्षात त्या मुलीने भेटायलाच नकार दिला. तिचे झिडकारणे तुषारला असह्य झाले. त्यामुळे त्याने मग तिला सारखे फोन करण्यास सुरुवात केली. अखेर वैतागून त्या मुलीने पोलिसांत तक्रार दिली.

नुकत्याच अस्तित्वात आलेल्या रोड रोमिओ पथकाकडे हे प्रकरण सोपवण्यात आले. याबद्दल समजताच तुषारने फोन बंद केला. पण पथक प्रमुख राहुल फुला यांनी तुषारची माहिती मिळवून त्याला बोलावून घेतले. फेसबुकवर त्या मुलीच्या नावाने तुषारचा मित्रच त्याला फसवत असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांसमोरही काय करावे, हा संभ्रम निर्माण झाला. त्यांनी दोघा मित्रांनाही समज देऊन त्यांच्यावर कारवाई केली.

तुषारच्या आई-वडिलांनाही मुलीची माफी मागावी लागली. दोन्ही मित्र आणि मुलगी यांचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी कारवाईबरोबर त्यांची समजूत काढून प्रकरण मिटवले.
भाडेकरूच्या मुलीने घरमालकाचे डेबिट कार्ड चोरले; मौजमजेसह देवदर्शनही उरकले