आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social Networking Site,Latest News In Divya Marathi

बंदला संमिश्र प्रतिसाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- सोशल नेटवर्किंग साइटवर राष्‍ट्रपुरुषांच्या वारंवार होणा-या विटंबनेच्या निषेधार्थ मंगळवारी पुकारण्यात आलेल्या वाळूज महानगर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही भागातील व्यापारी प्रतिष्ठाने नेहमीप्रमाणे सुरू असल्याने कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून फिरून ही दुकाने बंद करण्यास भाग पाडले. चोख पोलिस बंदोबस्ताने बंददरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
पंढरपूरच्या मुख्य महामार्गावरील दुकाने सकाळी उघडण्यात आली होती. परंतु कार्यकर्त्यांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली. बजाजनगरातील मोहटादेवी चौक, महाराणा प्रताप चौक, रमेश मोरे चौक, जयभवानी चौक भागातील क ाही दुकाने बंद होती. तर अनेक दुकानांमधून नेहमीप्रमाणे व्यवहार सुरू होते. वाळूज गावात बंदचा कुठलाही परिणाम जाणवला नाही. येथील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. पोलिसांची गस्ती वाहने ठिकठिकाणी फिरत होती. रांजणगाव शेणपुंजी, जोगेश्वरी परिसरात बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, दोषी व्यक्तीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या वेळी विलास पठारे, सुनील क ाळे, रमेश दाभाडे, सुखदेव सोनवणे, प्रवीण नितनवरे, संजय मिसाळ आदी उपस्थित होते.