आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल नेटवर्किंग साइट्सवर निर्बंध घाला, पण बंदी नको

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - युवापिढीच्या जिव्हाळ्याच्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर आक्षेपार्ह मजकूर अपलोडिंगविषयी याचिका दाखल करण्याला न्यायालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. या साइट्सवर बंदी आल्यास युवावर्गाला खूप फरक पडणार आहे.
मार्च महिन्यात फेसबुक, गुगल आणि युटयुब सारख्या 21 सोशल नेटवर्किंग साईट्सवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक जुने मित्र या बेवसाईटने जोडले गेले तसेच फोटो शेअरिंग, व्हिडिओ शेअरिंग अशा गोष्टी एकमेकांना उपलब्ध होतात. मात्र अनेक साईट्सवर आक्षेपार्ह मजकूर आल्याने या साइट्सवरील निर्बंधांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
धार्मिक भावना भडकाविणा-या मजकुरामुळे समाजात वैमनस्य तसेच जनक्षोभ उसळल्याच्या घटना नुकत्याच घडल्या. राष्ट्रीय एकात्मतेवरही याचा प्ररिणाम होतो शिवाय मुलींनाही त्रास होतो. या याचिेकेबाबत तरुणांच्या प्रतिक्रि या ‘दिव्य मराठीने’जाणून घेतल्या.
ब्राऊझिंग ब्लॉक करायला हवी - सोशल नेटवर्किंग साइट्सवर व्हिडिओ आणि फोटो अपलोड करण्यासाठी ज्या ब्राऊझिंग साइट्स आहेत, त्यांना ब्लॉक करायला हवे. सध्या अशा साइट्सवरून फोटो आणि व्हिडिओ सहज घेता येतात, पण साइट्सवर बंदी आणणे चुकीचे आहे. - मयुरेश गवळी
सेन्सॉर असावा, सोर्सकोड दिसू नये - सोशल नेटवर्किंग साइटवर कोणतेही फोटो, व्हिडिओ किंवा मजकूर अपलोड करताना त्यावर सेन्सॉर असावे. सोर्सकोड सहज दुस-यांना दिसतो, यामुळे अकउंट हॅक होते. सोर्सकोड दिसणे बंद झाल्यास असे प्रकार घडणार नाहीत. - नीरज चावला
फायदे अनेक आहेत - सोशल नेटवर्किंग वेबसाइट्समुळे अनेक लोक जोडले जातात, नव्या ओळखी होतात आणि जुने मित्र हे बसल्याजागी एकत्र येतात. थोड्या तोट्यांवर उपाय शोधायला हवेत, बंदी आल्यास फायदाही बंद होईल. - शेखर कुलकर्णी
मुलींबाबत जास्त प्रकार घडतात - मुलींच्या अकाउंट्सवर असे मजकूर पोस्ट करण्याचे प्रमाण अधिक घडते. मुलींना बदनाम करणे यासाठी असे करण्यात येते त्यामुळे मुलांच्या अकाउंटवर बंधन घालावे. - अमृता कदम
अकाउंट ब्लॉक होण्याची तरतूद असावी - सोशल नेटवर्किंग साइट्सचे अकाउंट हॅक झाल्यास आपोआपच अकाउंट ब्लॉक होईल, अशी सोय असावी. त्यामुळे हॅकर्सना आळा बसेल. हॅकिंगमागे उद्देश अकाउंट बळकावणे असा नसून एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण करणे व प्रतिमा डागाळणे असा आहे. - भूषण चव्हाण
लॉकिंग सिस्टिम आणावी - जास्तीत जास्त वेळा अ‍ॅप्लीकेशन अ‍ॅक्टिव्हेट करताना हॅकिंगचा प्रकार घडतो. त्यामुळे अ‍ॅप्लीकेशनला लॉकिंग असावे. याशिवाय युजर्सनेही काळजी घ्यायला हवी. सातत्याने ठरावीक कालावधीत पासवर्ड बदलावा. - पल्लवी भोसले
फेसबुक म्हणजे नवे समाजीकरण आहे - फेसबुकच्या माध्यमातून नवा ई-समाज उदयास आला आहे. सध्याच्या धकाधकीत एकमेकांना भेटण्याची संधी सातत्याने मिळत नाही. तेव्हा भेटी याच माध्यमातून घडून येतात.- अनिता पाखरे
बंधन घालणे महत्त्वाचेच - या साइटवर बंधन घालणे महत्त्वाचे आहे, कारण त्यांचा थेट संबंध लोकांच्या समाजातील प्रतिमेशी आहे. प्रतिमा डागाळल्याचा मानसिक, सामाजिक त्रास होत असतो.- पूजा पवार
डमी अकाउंट थांबविणे गरजेचे - अनेक मुलं साइट्वर डमी अकाउंट बनवितात. एकाच माणसाचे किमान 15 अकाउंट आहेत. त्यामुळे अनेक गैरप्रकार होत असतात. अशा अकाउंटद्वारे अनेकदा फसवणुकीचे प्रकार घडत असतात. त्याला आळा घालणे गरजेचे आहे. तसे झाले तरच गैरप्रकार टाळता येतील, पण अशाप्रकारे फेसबुक किंवा ट्विटर या साइटवर बंदी घालून समस्या सुटणार नाहीत. - ज्योतीराम कांदे