आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social News, 47% Dalit Are Workers In Rural Area, Divya Marathi News

ग्रामीण भागातील 47 टक्के दलितांचा आधार फक्त मजुरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यातील ग्रामीण भागात सुविधांचा लाभ दलित आणि एसटी प्रवर्गातल्या लोकांना किती मिळाला हे दलित समाजातल्या सोयीसुविधांवरून दिसून येते. यामध्ये 63 टक्के दलित समाजाकडे नळ कनेक्शन नाहीत, तर 67 टक्के लोकांकडे शौचालयाची सुविधा नाही. तसेच 32 टक्के लोकांना अजूनही वीज मिळाली नाही. तसेच एसटी वर्गातील- 76 टक्के, तर एससी 63 टक्के लोकांना पाण्याची सुविधा नाही. शिवाय 67 टक्के दलित आणि 78 टक्के एसटी वर्गाकडे शौचालये नाहीत.
प्राथमिक माध्यमिक उच्च्
एसटी 89 52 8.80
एससी 98 67 22
ओबीसी 90 72 18
‘एनएसएस’नुसार शिक्षण घेणार्‍यांची स्थिती
मूलभूत सुविधांपासून दलित वंचित
65 टक्के दलितांना संधी नाही
गेल्या चाळीस वर्षांतली परिस्थिती पाहिली तर दलित समाजात अनेक सुधारणा झाल्या आहेत. विशेष म्हणजे दलित समाजातील 65 टक्के लोकांना गुणवत्ता असूनही संधी मिळत नसल्याचे मत व्यक्त करून त्यांनी 2012 च्या एनएसएस (नॅशनल सँपल सव्र्हे) नुसार एसटी समाजातील 9 टक्के, तर दलित समाजातील 22 टक्के विद्यार्थी उच्च् शिक्षण घेतात, असे स्पष्ट केले.
राजकीय चळवळीत मूळ प्रश्न बाजूला
डॉ. थोरात म्हणाले, माहितीअभावी राजकीय चळवळीने दलितांच्या मूळ प्रश्नाला हात घातलाच नाही. आमच्यावर अन्याय झाला ही दलितांची ओरड कायम असते. मात्र तो अन्याय पुरावे आणि माहितीच्या आधारे मांडलाच गेला नाही. राजकीय चळवळीलाही याची माहिती नाही, प्राध्यापकही माहिती मिळवत नाही. त्यामुळे खासगीकरण, कॉर्पोरेट तसेच इतर गोष्टींचे दलितांवर काय परिणाम होतात याचा अभ्यास केला गेला नाही.
ग्रामीण भागातील मजुरीचे प्रमाण : एससी - 47
एसटी- 41 , ओबीसी- 24
लोकआंदोलनाची गरज
डॉ. काबंळे म्हणाले, दलितांच्या विकासाच्या योजनांची अंमलबजावणी होत नाही. अन्याय सांगायचा तर त्याच्या आकडेवारीचीही माहिती नसते. नियोजन करतानाची पद्धत चुकीची असून त्याबाबतचा आधारही चुकीचा असतो. त्यासाठी लोकआंदोलन करण्याची गरज आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू घुगे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तयार करण्यात येणार्‍या योजना लोकांपर्यत पोहोचत नसल्याचे मत व्यक्त केले, तर दलितांच्या प्रश्नांवर एकजुटीने लढले पाहिजे, असे मत आव्हाड यांनी व्यक्त केले.