आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमोफिलिया सोसायटीचा 16 वर्षांपासून लढा, रुग्णांना सामान्य माणसासारखे जीवन जगवण्यासाठी धडपड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- हिमोफिलिया फेडरेशन इंडिया, नवी दिल्ली या संस्थेशी संबंधित हिमोफिलिया सोसायटी औरंगाबाद चॅप्टर या सामाजिक संस्थेने सोळा वर्षांपासून रुग्णहितासाठी लढा सुरू केला आहे. हिमोफिलियाचे रुग्ण शोधून त्यांना सामान्य माणसासारखे जीवन जगता यावे यासाठी फॅक्टर आठ, नऊ ही औषधे उपलब्ध करून देण्याचे काम ही सोसायटी करत आहे. ही औषधे मोफत मिळावीत यासाठीही पाठपुरावा सुरू अाहे. चिकलठाणा येथील शासकीय रुग्णालयात हिमोफिलिया डे केअर सेंटरला मान्यता मिळाली आहे. मात्र, हे रुग्णालय उद््घाटनाच्या प्रतीक्षेत अाहे. हे रुग्णालय सुरू होण्यासाठीही ही संस्था पाठपुरावा करत आहे. 

हिमोफिलिया हा एक अानुवंशिक रक्तदोष आहे. रक्त गोठणाऱ्या घटकांच्या कमतरतेमुळे रुग्णांना आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. अशा रुग्णांना अँटी हिमोफिलिक फॅक्टर औषध दिले जाते. हे औषध वेळेत मिळाल्यास रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. जिल्ह्यात हिमोफिलियाचे ४५० रुग्ण आहेत. एका रुग्णाला वर्षाकाठी एक लाख रुपये खर्च येतो. जिल्ह्यातील रुग्णांसाठी चिकलठाणा येथील शासकीय रुग्णालयात डे केअर सेंटर उर्वरितपान.६ 

सोसायटीचा उद्देश 
समाजात विखुरलेला िहमोफिलियाचे रुग्ण शोधून त्यांची नोंदणाी करणे, त्यांना हिमोफिलियाबाबत माहिती औषधोपचाराची व्यवस्था करणे, हिमोफिलिया आजारात होणारा रक्तस्राव रोखण्यासाठी लागणारे फॅक्टर आठ नऊ हे स्वस्त दरात उपलब्ध करून देणे, हिमोफिलिया रुग्णांच्या पुनर्वसनासाठी योजना तयार करणे हे कार्य सोसायटी करते. 

या ठिकाणी औषधे उपलब्ध 
हिमोफिलिया रुग्णंाचेे फॅक्टर आणि परदेशातून अायात होतात. मुंबई येथील केईएम रुग्णालय, पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न ससून रुग्णालय, सातारा, नाशिक, ठाणे, अमरावती येथील जिल्हा रुग्णालयंात हे औषध मिळते. 

रुग्णांना डे केअर सेंटरची प्रतीक्षा 
अारोग्य सेवा संचालनालयामध्ये १५ ऑक्टोबर २०१६ रोजी हिमोफिलियाबाबत झालेल्या बैठकीत राज्यातील रुग्णांसाठी शासनाने २५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हिमोफिलियाच्या रुग्णांना शहरात कधी हिमोफिलिया डे केअर सेंटर सुरू होते याची प्रतीक्षा आहे. 

प्रत्येक क्षण मरणयातनेचा 
आमचा प्रत्येकक्षण मरणयातनेचा असतो. आम्हाला खूप जपून राहावे लागते. शरीरातील कोणत्याही भागात रक्त गोठल्यानंतर त्याचा त्रास होतो. सध्या हातपाय वाकडे झाले आहेत. सरकारने शहरात फॅक्टर (रक्तघटक) उपलब्ध करून द्यावे. 
- ऋषिकेश मानकर, रुग्ण 
 
औषधी शहरात मिळावी 
हिमोफिलियाच्यारुग्णांनालागणारे रक्तघटक महागडे असतात. शासनाने येथे त्वरित औषध उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पाठपुरावा करूनही सरकार दुर्लक्ष करत आहे. ही औषधे मोफत मिळावीत यासाठीही आमचा पाठपुरावा सुरू आहे. 
- डॉ.जी. एस. कुलकर्णी, अध्यक्ष हिमोफिलिया सोसायटी 
बातम्या आणखी आहेत...