आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social News In Marathi, Aganwadi Sevika's Strike, Divya Marathi

अंगणवाडी सेविकांचे मंगळवारी मुंबईतील आजाद मैदानावर धरणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानधनवाढीचे आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न करणार्‍या सरकारच्या विरोधात राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी तीव्र आंदोलन छेडले असून मुंबई येथील आझाद मैदानावर 25 फेब्रुवारीला धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील हजारो सेविका सहभागी होणार आहेत.
किमान वेतन लागू करून गोवा राज्याच्या धर्तीवर सेविकेस 14 हजार व मदतनिसांना सात हजार मानधन देणे किंवा किमान वेतन दहा हजार देणे, या व अन्य मागण्यांच्या संदर्भात 20 फेब्रुवारीला औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली होती. आचारसंहिता लागण्यापूर्वी मानधनात वाढ करण्यात यावी यासाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मंगळवारी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार असून सोमवारी (24 फेब्रुवारी) जिल्ह्यातील शेकडो सेविका मुंबई येथे रवाना होणार आहेत. यामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयटकप्रणीत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनचे कॉ. राम बाहेती, कॉ. अनिल जावळे, क ॉ. तारा बनसोडे, कॉ. विलास शेंगुळे, कॉ. शालिनी पगारे यांनी केले आहे.