आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Social News In Marati,demand For New Gram Sevak, Divya Marathi

ग्रामसेवकाची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर तालुक्यातील आलापूरवाडी येथील ग्रामसेवकाच्या सततच्या गैरहजेरीमुळे ग्रामस्थ वैतागले आहेत. यासंबंधी ग्रामपंचायतीने गटविकास अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. त्यावर गटविकास अधिकार्‍यांनी त्या ग्रामसेवकाला नोटीस बजावून पदभार काढून घेतला. मात्र, ग्रामसेवक काम करण्यास आणि पदभार सोडण्यासही तयार नसल्याने ग्रामपंचायतीची कामे खोळंबली आहेत.
हजार लोकवस्ती असलेल्या आलापूरवाडी येथील ग्रामपंचायतीचा कारभार सध्या ग्रामसेवकाविना सुरू आहे. चार महिन्यांपूर्वी पैठण येथील ग्रामसेवक बी. जी. गाडे यांनी आलापूरवाडी ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारला होता. मात्र, त्यानंतर ते चार दिवसच हजर झाले. ते पुन्हा आले नाहीत; परंतु त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास सतत बंद येई, लागलाच तर उचललाही जात नसे. ग्रामपंचायतीला शासनाच्या विविध योजना राबवण्यात अडचणी येत आहेत. आलापूरवाडीच्या सरपंच पद्माताई मुळे यांनी वैजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांच्याकडे ग्रामसेवक बी. जी. गाडे मुख्यालयी हजर राहत नसल्याबाबत तक्रार केली असता, त्यांनी तत्काळ गैरहजर राहणार्‍या ग्रामसेवकाचा पदभार काढून घेऊन तो धाडबळे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला. मात्र, गाडे हे आपल्याकडील पदभार सोपवण्यास आणि मुख्यालयी थांबण्यास तयार नसल्याने ग्रामस्थांची कामे अडली असल्याने तत्काळ नवीन ग्रामसेवक देण्याची मागणी होत आहे.