आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजसेवेसाठी व्ही-व्हॉलेंटिअर्स संस्थेत युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद : कसलीही प्रसिध्दीची हाव आणि गाजवाजा करता व्ही-व्हॉलेंटिअर्स संस्थेच्या स्वयंसेवकांनी सहा वर्षांत ५८३० जणांचे प्राण वाचवले. व्ही- व्हॉलेंटिअर्स संस्था स्वयंसेवक तयार करत आहे.
 
यासाठी शाळा, महाविद्यालये, कंपन्यांत मोफत कार्यशाळा घेऊन कायदे आणि प्रथमोपचाराची माहिती दिली जाते. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यास स्वयंसेवक बनवून घेतले जाते. त्यास एक ओळखपत्र आणि महत्त्वाच्या क्रमांकाची यादी दिली जाते. एकही जखमी मदतीविना मृत्युमुखी पडू नये, हाच त्यांचा उद्देश आहे. यामुळेच जिल्हाभरात वर्षांत ९१३० स्वयंसेवक तयार झाले असून त्यांनी ५८३० जीव वाचवले आहेत.
 
एका किलोमीटरमध्ये किमान २० स्वयंसेवक अशा पद्धतीने एक लाख स्वयंसेवक घडवण्याचा संस्थेचा मानस आहे. मोटिव्हेशनल ट्रेनर आणि कम्युनिकेशन स्किल डेव्हलपर राजेश चंचलानी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या संस्थेला गंगापूरचे मनीष वर्मा, प्रवीण पारीख आणि पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य राजमहेंद्र सावंत तसेच स्वयंसेवक यांचे सहकार्य मिळत आहे. 
 
असे वाचले जीव 
गंगापूरचे गणेश राऊत, सुनील वाघमारे उज्ज्वला नरवडे यांनी अनेकांचे प्राण वाचवले आहेत. कायद्याची विद्यार्थिनी सलोनी शेलकर पाटीलच्या प्रयत्नांमुळे अपघातातील १० जण सुखरूप घरी पोहोचले. 
 
गाजावाजा करता केला १५ जणांचा सत्कार 
फार गाजावाजा न करता सहा वर्षांपासून कार्य करणाऱ्या व्ही-व्हॉलेंटिअर्सच्या १५ स्वयंसेवकांचा रविवारी महसूल प्रबोधिनीत सत्कार करण्यात आला. या वेळी सलोनी शेलकर पाटील, मधुसूदन कल्याणकर, सुनील वाघमारे, उज्ज्वला नरवडे, गणेश राऊत, अाचार्य टाक, अनिल लुनिया, मच्छिंद्र पठारे, ऋषिकेश जैस्वाल, प्रवीण भारती, अमोल पुजारी, अतुल रासकर यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले, तर १०८ रुग्णवाहिका आणि हायवे पोलिसांच्या एका प्रतिनिधीचाही या वेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सुरेश पिंपळे, प्रा. राजमहेंद्र सावंत, मनीष वर्मा, राजेश चंचलानी,श्रीमती लुनिया, आयसीडब्ल्यूएआयचे जोशी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...