आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भपात करण्याची हिंमत होते, पण हुंडा रोखण्याची नाही; कमला भसीन यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतीय संस्कृती, परंपरा महान मानल्या जातात. परंतु त्याच संस्कृतीच्या नावाखाली घरातच सर्वाधिक हिंसा महिला, मुलींसोबत घडतात. गर्भपात करण्याची हिंमत आहे, परंतु परंपरेच्या नावाखाली हुंडा पद्धत थांबवण्याची हिंमत नाही, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कमला भसीन यांनी व्यक्त केले.
 
सजग महिला मंडळाच्या वतीने स. भु. शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात गुरुवार, नोव्हेंबर रोजी सामाजिक स्थिती, महिलांचे प्रश्न या विषयावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी भारतीयच नाही, तर परदेशातील महिलांचे प्रश्न सामाजिक स्थिती याविषयी त्यांच्याशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला. भसीन म्हणाल्या, मी सुरुवातीला गरिबीसंदर्भातील कामाला सुरुवात केली. त्यानंतर कामादरम्यान आदिवासी, दलित, गावातील महिलांविषयीचे प्रश्न, समस्या लक्षात आल्या.

त्यानंतर महिलांच्या समस्या सोडवण्यास सुरुवात केली. १९७५ पासून दक्षिण आशियात काम सुरू आहे. जर युरोपियन देशांत परितर्वतन हवे असेल तर दक्षिण आशियातील कामाचे स्वरूप समजावून घेतले पाहिजे, असेही भसीन म्हणाल्या. आज संस्कृती आणि परंपरेच्या नावाखाली अनेक बंधने लादण्यात येतात.

आज महिला आवाज उठवताना दिसत असल्या तरी त्यांचा संघर्ष खूप मोठा आहे. बरोबरी आणि समानतेबाबत आपण नेहमी बोलतो. परंतु कोणतीही सत्तेत प्रेमाने बदल करायला हवे. हिंसेचा विरोध हिंसेतून होऊ शकत नाही. हिंसेचा विरोध हा अहिंसेपेक्षा प्रेमाने असायला हवा,असेही त्या म्हणाल्या. या वेळी या वार्तालापाचा समारोप “मैं लडकी हूं, मुझे पढना हैं’ या गीताने करण्यात आला. डॉ. मनोरमा शर्मा, मंगल खिवंसरा, डॉ. स्मिता अवचार तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ. रश्मी बोरीकर यांनी सूत्रसंचालन केले.
 
परिवर्तनासाठी जनतेलाच दबाव निर्माण करावा लागेल. महिलांवरील अत्याचार अथवा समस्या आपल्याच देशात नाही, तर अमेरिकेसारख्या देशातही आहेत. जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने चळवळी सुरू आहेत. ही लढाई केवळ स्त्री-पुरुष नाही, तर दोन विचारधारांची, समानतेची लढाई आहे. निसर्गाने भेद बनवला; परंतु भेदभाव हा मानवाने निर्माण केला आहे. समानतेचे परिवर्तन करण्यासाठी जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.
बातम्या आणखी आहेत...