आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरुळच्या लेण्यांना अभिनेत्री साेफिया हयातने दिली भेट, म्हणाली- मी विश्वाची माता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ‘मला शिवजींनीच बोलावले अाहे. त्यांना भेटण्यासाठीच मी कैलास लेणी घृष्णेश्वरला जात आहे. अाता मी ‘विश्वाची माता’ बनली असून यापुढे कधीच चित्रपटात काम करणार नाही,’ अशी भावना यापूर्वी चित्रपटातील बाेल्ड सीनमुळे चर्चेत अालेली ‘बिग बाॅस’च्या सातव्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्री साेफिया हयात हिने ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केली.
पाच वर्षांपूर्वी ब्रिटिशहून भारतात आलेल्या सोफिया हयातने हॉट सीन्स करून बॉलीवूडमध्ये अल्पावधीत नाव कमावले. याच काळात तिचे नाव काही बाॅलीवूड अभिनेत्यांसाेबतही जाेडले गेले, यातून ती जास्तच चर्चेत अाली. काही दिवसांपूर्वी बिग बाॅस रिअॅलिटी शाेच्या सातव्या भागात सलमान खानसाेबत ती या स्पर्धेत उतरली हाेती. मात्र अचानक प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा तिला ‘साक्षात्कार’ झाला अाणि साेफियाने ‘बी’टाऊन साेडले.
‘मला देवाज्ञा झाली असून मी सृष्टीची माता बनली अाहे,’ असे ती सांगते. मागील तीन महिन्यांत तीने बुद्धगया, वाराणसी या तीर्थक्षेत्राला भेट दिली, तर काही दिवसांपूर्वीच ती अाैरंगाबादेतही येऊन गेली. ‘दिव्य मराठी’शी संवाद साधताना सोफिया म्हणाली, ‘सौंदर्याच्या जाेरावर मी अल्पावधीत खूप माया कमावली. मात्र, हे करीत असताना सौंदर्यांवर रंगाचा मुलामा लावून देखावा करावा लागतो, याचा मला वाईट अनुभव अाला.
मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड पुरस्कार साेहळा हा केवळ फसवेगिरीचा धंदा असल्याची जाणीव झाली. त्यामुळे या झगमगाटाचा नाद मी साेडला. अाता नितळ सौंदर्य काय असते हे दाखवून देत मुलांना त्यांच्या आईच्या नात्याने सौंदर्य काय असते याची जाणीव करून देणार अाहे. मी नन झाले अाहे, भविष्यात लग्नच करणार नसून केवळ मदर बनून समाजाची सेवा करणार आहे.

‘मला शिवजींनी अनेकदा बोलावले अाहे. त्यांना भेटण्यासाठीच मी देशभरातील सर्व शिव मंदिरात जात आहे. वेरूळ येथील कैलास लेणी घृष्णेश्वर मंदिरात जाऊन ध्यान करून शिवजींशी बोलणार आहे,’ असे ती सांगते. अाैरंगाबादच्या दाेन दिवसांच्या दाैऱ्यात साेफिया कधी पंचतारांकित हाॅटेलात तर कधी मंदिरात राहिली.
पुढील स्लाईडवर वाचा.....इंग्लंडमध्ये उभारले वेकअप मंदिर... साेफियाने कशी केली प्रार्थना.... बघा तिचे फोटो....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तरURLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...